
पनवेल : नगरसेविका मुग्धा लोंढे यांच्या अपघाती निधनामुळे रिक्त झालेल्या प्रभाग क्रमांक १९-ब करिता गुरुवारी (ता.९) घेण्यात आलेल्या मतदानात प्रभागातील २८ हजार ३५० मतदारांपैकी केवळ ८ हजार ७९७ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. रिक्त झालेल्या या पोटनिवडणुकीत मतदारांचा अनुत्साह पाहायला मिळाला.
पनवेल शहरातील प्रभाग क्रमांक १९-ब मधील भाजप नगरसेविका मुग्धा लोंढे यांचा काही महिन्यांपूर्वी अपघाती मृत्यू झाल्याने रिक्त झालेल्या जागेवर गुरुवारी मतदान घेण्यात आले.
लोंढे यांच्या जागेवर त्यांच्या कन्या रुचिता लोंढे यांना भाजपतर्फे उमेदवारी घोषित करण्यात आल्याने भावनेच्या मुद्यावर विरोधी पक्षामार्फत उमेदवार न देता प्रभाग क्रमांक १९-ब करिता होणारी ही निवडणूक बिनविरोध होईल अशी अपेक्षा भाजपतर्फे केली जात होती; मात्र राज्यात निर्माण झालेल्या नव्या समीकरणानुसार शिवसेना, शेकाप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाआघाडीतर्फे सेनेच्या स्वप्नल कुरघोडे यांना उमेदवारी घोषित झाल्याने गुरुवारी पार पडलेल्या निवडणुकीत केवळ ३१.०३ टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.
सेना कार्यकर्ते नाउमेद
सकाळी ७.३० पासून सुरू झालेल्या मतदान प्रक्रियेदरम्यान मतदारांमध्ये मतदान केंद्राबाबत संभ्रम झाल्याचे पाहायला मिळाले. अनेक मतदारांना मतदान केंद्राची माहिती नसल्याचे पाहायला मिळाले असून, निवडणूक अधिकाऱ्यांकडून नेमण्यात आलेल्या बीएलओंकडे मतदारांची माहिती देण्याकरिता अल्फाबेटिकल यादी, तसेच लॅपटॉप नसल्याचे पाहायला मिळाले आहे.
शेकापचे दुर्लक्ष
मुग्धा लोंढे यांच्या अपघाती मृत्यूमुळे रिक्त झालेल्या जागेकरिता बिनविरोध निवडणूक होणे अपेक्षित असताना काही शेकाप नेत्यांनी सेनेच्या उमेदवारांच्या खांद्यावर बंदूक ठेवून निवडणूक लढवल्याची चर्चा सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये होती. निवडणूक प्रचारादरम्यान शेकापकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याची चर्चादेखील या वेळी करण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.