
Mumbai News : इलेक्ट्रिक बस बनवण्याऱ्या ऑलेक्ट्राच्या नफ्यात घसघशीत वाढ
मुंबई : 25 जानेवारी, 2023:ऑलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेड (OLECTRA), डिसेंबर 2022 ला संपलेल्या तिमाहीत 248.6 कोटी रुपयांचा अनऑडिटेड महसूल नोंदवला गेला आहे. आर्थिक वर्ष 22-23 च्या तिसर्या तिमाहीत 20 टक्क्यांची ही लक्षणीय महसुलातील वाढ मुख्यत्वे चालू तिमाहीत 142 इलेक्ट्रिक बसेसच्या पुरवठ्यामुळे झाली आहे,
डिसेंबर 2021 मध्ये संपलेल्या मागील वर्षातील तिमाहीत 103 बसेस पुरवल्या गेल्या होत्या ३१ डिसेंबर २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीत रु. १२.५ कोटी निव्वळ नफ्याच्या तुलनेत डिसेंबर २०२२ ला संपलेल्या तिमाहीत कंपनीने १३.० कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. डिसेंबर 22 रोजी संपलेल्या चालू नऊ महिन्यांच्या कालावधीसाठी महसूल 766.0 कोटी रुपये झाला म्हणजेच तो 141 टक्क्यांनी वाढला आहे. निव्वळ नफ्यात २४.७ कोटी रुपयांची वाढ झाली आहे.
आर्थिक वर्ष 22-23 च्या 3 ऱ्या तिमाहीत कंपनीची इलेक्ट्रिक बसेसची निव्वळ ऑर्डर 3,220 नग आहे. वर्षाच्या सुरुवातीला, कंपनीने नागपूर, सिल्वासा, सुरत आणि डेहराडून येथे डिलिव्हरी पूर्ण केली.