MSEB
MSEB

नवी मुंबईत वीजचोरीच्या प्रमाणात मोठी वाढ!

नवी मुंबई - बाजारात उपलब्ध असलेल्या विविध तंत्रज्ञानांमुळे नवी मुंबईसारख्या स्मार्ट सिटीमध्येही वीजचोरांचे प्रमाण कमालीचे वाढत चालल्याचे आढळून आले आहे. बेकायदा विजेचा वापर करणे आणि मीटरमध्ये फेरफार करून वीज वापरणे असे वीज चोरीचे दोन प्रकार पडतात.

२०१८ मध्ये बेकायदा वीज वापर करणाऱ्यांवर २६६ कारवाया महावितरणने केल्या होत्या. २०१९ डिसेंबरपर्यंत हाच आकडा २६६ पर्यंत गेला आहे. अजून तीन महिने शिल्लक असताना मार्च २०२० पर्यंत हा आकडा आणखी वाढण्याची शक्‍यता आहे. अशा वीजचोरांना धडा शिकवण्यासाठी महावितरणनेही कंबर कसली असून, त्यांच्याकडून दोन वर्षांत पाच कोटींचा दंड वसूल करण्यात यश आले आहे.

विकसनशील शहर असल्यामुळे नवी मुंबई शहरात दिवसेंदिवस वीज ग्राहकांची संख्या वाढत चालली आहे. ग्राहकांच्या या वाढत्या संख्येसोबत वीज वापराचे प्रमाणही वाढले आहे; मात्र काही ग्राहकांकडून महावितरणची दिशाभूल करून बेकायदा पद्धतीने वीज वापर केला जात आहे. अशा वीजचोरांवर महावितरणकडून कारवाई केली जात आहे. व्यावसायिक वापरासाठी वीज घेऊन त्याचा वाणिज्य अथवा व्यावसायिक वापर करणाऱ्यांचे  वाढले असून, गेल्या दोन वर्षांत ५२६ कारवाई केल्याची आकडेवारी समोर आली आहे. कारवाई केलेल्या या लोकांना महावितरणने दोन वर्षांत सुमारे १० कोटी रूपयांचा दंड ठोठावला आहे. त्यापैकी ९५ लोकांकडून साडेतीन कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात महावितरणला यश आले आहे. मीटरमध्ये फेरफार करून वीजचोरी करणाऱ्यांवर दोन वर्षांत ९३९ कारवाया करण्यात आल्या आहेत. या प्रकारात सुमारे दोन कोटींचा दंड ठोठावण्यात आला होता. सुमारे ५०० जणांकडून एक कोटी एवढा दंड वसूल करण्यात महावितरणला यश आले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com