वीज कायद्याविरोधात कामगार संघटना बेमुदत संपाचं हत्यार उपासणार!

राज्यातील 86 हजार कामगार 10 ऑगस्टच्या संपात होणार सहभागी
Strike
StrikeSakal media

मुंबई : सुधारित विद्युत कायद्याविरोधात (Electrical Act) नॅशलन कोऑर्डिनेशन कमिटी ऑफ एम्प्लॉईज अँड इंजिनिअरिंग या संघटनेने बेमुदत संपावर (Strike) जाण्याचा इशारा दिला आहे. या संघटनेच्या आवाहनानुसार राज्यातील तीन वीज कंपन्यांमधील 24 संघटनांची (Company union) एकजूट झाली असून 10 ऑगस्टच्या संपात सहभागी होण्याचा निर्णय संघटनांनी घेतला आहे. राज्यातील 86 हजार कामगार (Workers) या संपात सहभागी होणार असून त्याबाबतची नोटीस महावितरण, महानिर्मिती आणि महापारेषण या कंपन्यांच्या अध्यक्षांना संघटनेने पाठविली आहे. (Electrical Company union decided to go on strike for unconfirmed tenure- nss91)

केंद्र सरकारने विद्युत कायद्याचा सुधारित मसुदा तयार केला आहे. या मसुद्यात देशातील वीजवितरण व्यवसायात खासगीकरणाला चालना देण्यासाठी आदर्श निविदा संहिता उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे केंद्रीय उर्जा विभागाने संहितेमध्ये म्हटले आहे. तसेच सरकारी 100 टक्के खासगीकरण आणि 74 टक्के खासगीकरण असे दोन पर्याय दिले आहेत. त्याचप्रमाणे खासगीकरण झाल्यानंतर 5 ते 7 वर्ष राज्य सरकारने संबंधीत खासगी कंपनीला आर्थिक पाठबळ देण्याची सुचवले आहे.

Strike
रेल्वेचा मान्सूनपूर्व कामांचा दावा फोल, घाटात रेल्वेचे नुकसान

खासगीकरण करताना कंपनीला 25 वर्षांसाठी वीजवितरण परवाना देण्यात येणार आहे. याबाबत लोकसभा आणि राज्यसभेत हे विधेयक मजुरीसाठी मांडण्यात येणार आहे. त्याला देशातील सात प्रमुख अभियंते व कामगार यांच्या नॅशलन को ऑर्डिनेशन कमेटी ऑफ एम्प्लॉईज अँड इंजिनिअरिंग या संघटनेने विरोध केला आहे. सरकारने कायदा मंजूर केल्यास देशातील 15 लाखाहून अधिक कर्मचारी, अभियंते 10 ऑगस्टला संपावर जातील, असा इशारा संघटनेने दिला आहे.

या संपामध्ये राज्यातील संघटनांनी सहभागी व्हावे असे आवाहन नॅशलन को ऑर्डिनेशन कमेटी ऑफ एम्प्लॉईज अँड इंजिनिअरिंग या संघटनेने केले आहे. त्यानुसार राज्यातील महावितरण, महानिर्मिती आणि महापारेषण या कंपन्यांतील 24 संघटनांनी एकत्रित येत वीज कर्मचारी अभियंते व अधिकारी संघटनांची राज्यस्तरीय संघर्ष समिती तयार केली आहे. या समितीमध्ये सुधारित कायद्याविरोधात मैदानात उरतण्याचा निर्णय घेतला असून त्याबाबतची नोटीस महावितरण, महानिर्मिती आणि महापारेषण या कंपन्यांच्या अध्यक्षांना देण्यात आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com