Electricity: आता वीज बिलांमध्ये २४ टक्केपर्यंत करता येणार बचत, कशी? वाचा सविस्तर

electricity
electricitysakal

टाटा पॉवर १४ ते २१ डिसेंबर दरम्यान ऊर्जा संवर्धन सप्ताह साजरा करून जागरूकतेला आणि ऊर्जा बचत सक्षम प्रथांना प्रोत्साहन देत आहे. मुंबईमध्ये ही कंपनी कमी खर्चाच्या आणि पर्यावरणस्नेही ऊर्जा उपाययोजनांमार्फत ऊर्जा संवर्धनासाठी प्रयत्नशील आहे.

या उपक्रमात सहभागी होऊन ग्राहक ऊर्जा उपकरणांवर आकर्षक सूट मिळवू शकतात, त्यामुळे वीज बिलामध्ये १२ ते २४ टक्के ची घट होण्यात मदत होऊ शकते. कंपनीने आपल्या मुंबईकर ग्राहकांना घरपोच डिलिव्हरीमार्फत डिस्काउंटेड किमतींमध्ये ५००० पेक्षा जास्त ऊर्जा बचत सक्षम उपकरणे यशस्वीपणे पोहोचवली आहेत, त्यामुळे ४.४५ मिलियन युनिट्स विजेची बचत झाली आहे.

electricity
Electricity: वापर वीतभर बिल हाथभर ; शेतकऱ्यांला आले १ लाख २९ हजाराचे विज-बिल

कंपनीने हाती घेतलेल्या या उपक्रमांमुळे बचतीबरोबरीनेच पर्यावरणावर देखील सकारात्मक प्रभाव पडला आहे. ऊर्जा संवर्धन सप्ताहामध्ये अनेक विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. कंपनीबाहेरील तज्ञांकडून ऊर्जा संवर्धनावर वेबिनार, चित्रकला स्पर्धा, शाळांमध्ये क्विझ आणि महत्त्वाच्या व इन्स्टिट्यूशनल ग्राहकांसाठी विशेष ऊर्जा संवर्धन पुरस्कार इत्यादींचा यामध्ये समावेश आहे.

पर्यावरणपूरकतेप्रती आपली वचनबद्धता अधोरेखित करत टाटा पॉवर आपल्या ग्राहकांना १०० टक्के हरित वीज पुरवून पर्यावरण संवर्धन करण्यासाठी सक्षम बनवले आहे. ३०००० पेक्षा जास्त ग्राहकांना हरित ऊर्जा पुरवली जात असून त्यामुळे ३०० मिलियन युनिट्सपेक्षा हरित ऊर्जेची विक्री दरवर्षी केली जात आहे.

स्मार्ट मीटर इंस्टॉलेशनमध्ये देखील ही कंपनी आघाडीवर आहे. यामध्ये डेटा ऍनालिटिक्स आणि वीज वापर पॅटर्न्सच्या अनुमानामुळे डाऊनटाइम कमी करण्यात मदत होते. कंपनीने मुंबईमध्ये आपल्या ग्राहकांसाठी १,२५,००० पेक्षा जास्त स्मार्ट मीटर इन्स्टॉल केले आहेत आणि आर्थिक वर्ष २०२५ पर्यंत ७,५०,००० ग्राहकांना स्मार्ट मीटर पुरवले जातील.

electricity
Electric Blanket : यंदाच्या हिवाळ्यात थंडीला करा रामराम, ही इलेक्ट्रिक रजाई देईल उबदार आराम; किंमतही अगदी कमी

टाटा पॉवरच्या सेवा ऊर्जा बचत सक्षम उपकरणांपुरत्या मर्यादित नाहीत, यामध्ये एनर्जी ऑडिट्स, वीज गुणवत्तेचे मूल्यांकन, वीज सुरक्षा ऑडिट्स आणि हरित बांधकाम सर्टिफिकेशनसाठी साहाय्य यांचा समावेश आहे. याखेरीज, अत्यंत दक्ष आणि सक्रिय हरित भविष्य प्रदान करण्यासाठी, टाटा पॉवरने डिमांड रिस्पॉन्स प्रोग्राम सुरु केला. बिहेवियरल डिमांड रिस्पॉन्स प्रोग्राममार्फत व्हॉलंटरी लोड मॅनेजमेंटला प्रोत्साहन देऊन, स्मार्ट मीटर सिस्टमसह सुसज्ज ग्राहकांशी जोडले जाणे हा याचा उद्देश आहे.

६० टक्के ग्राहकांनी ई बिल सुविधेचा स्वीकारला पर्याय

टाटा पॉवरच्या ६० टक्के ग्राहकांनी ई-बिल सुविधेचा पर्याय स्वीकारला आहे. टाटा पॉवरचे मुंबईतील ८८टक्के पेक्षा जास्त ग्राहक त्यांची बिले ऑनलाईन भरतात. यामुळे ४८ लाख कागदांची बचत होत आहे. आता ग्राहक पर्यावरणपूरकतेचा स्वीकार करण्यासाठी टाटा पॉवरसोबत २४X७ टोलफ्री क्रमांक १९१२३ वर किंवा व्हाट्सऍप क्रमांक ७०४५११६२३७ वर संपर्क साधू शकतील.  

electricity
Electric Bike : धावत्या इलेक्ट्रीक बाईकने घेतला पेट

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com