सिद्धार्थ कॉलनीची वीज पूर्ववत

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 15 August 2019

मुंबई : रहिवाशांच्या तीव्र आंदोलनापुढे नमते घेत अखेर अदानी कंपनीने महिनाभरानंतर सिद्धार्थ कॉलनीचा वीजपुरवठा सुरू केला. त्यामुळे अनेक दिवसांपासून अंधारात राहणाऱ्या साडेतीन हजारांहून अधिक कुटुंबियांना स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला प्रकाशाचा आनंद मिळाला. वीज सुरू करण्याचा निर्णय झाला असला तरी राहिवाशांना जूनपासूनची बिले तातडीने भरावी लागणार आहेत.

मुंबई : रहिवाशांच्या तीव्र आंदोलनापुढे नमते घेत अखेर अदानी कंपनीने महिनाभरानंतर सिद्धार्थ कॉलनीचा वीजपुरवठा सुरू केला. त्यामुळे अनेक दिवसांपासून अंधारात राहणाऱ्या साडेतीन हजारांहून अधिक कुटुंबियांना स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला प्रकाशाचा आनंद मिळाला. वीज सुरू करण्याचा निर्णय झाला असला तरी राहिवाशांना जूनपासूनची बिले तातडीने भरावी लागणार आहेत.

सिद्धार्थ कॉलनीच्या विकासकांनी तब्बल ७७ कोटी रुपयांचे वीजबिल न भरल्याने अदानी कंपनीने १४ जुलैपासून रहिवाशांचा वीजपुरवठा खंडित केला होता. तो सुरळीत करावा म्हणून रहिवासी कित्येक दिवसांपासून उपजिल्हधिकारी, पोलिस उपायुक्त आणि अदानी कंपनीवर मोर्चे काढत होते; मात्र पदरी निराशाच पडत होती. अखेर सहनशीलतेचा अंत झाल्याने संतापलेल्या रहिवाशांनी सोमवारी (ता. १२) टिळकनगरमधील अदानी इलेक्‍ट्रिसिटीच्या कार्यालयावर मोर्चा काढला. आक्रमक झालेल्या रहिवाशांनी कार्यालयाच्या दोन्ही मुख्य दरवाजांना टाळे ठोकले. त्यामुळे कंपनीचे अनेक कर्मचारी कार्यालयातच अडकून पडले होते. अखेर चेंबूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक जयप्रकाश भोसले व टिळक नगर ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्ष सुशील कांबळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. आमदार प्रकाश फातर्पेकरही उपस्थित होते. अधिकाऱ्यांच्या मनमानी मुळे रहिवासी अधिकच आक्रमक झाले. त्यांनी कार्यालयातून बाहेर पडणारे सर्वच दरवाजे बंद केले. कोंडून ठेवलेल्या अधिकाऱ्यांनी अखेर संध्याकाळी ७ वाजता ठोस आश्‍वासन दिल्यानंतर रहिवाशांनी त्यांची सुटका केली; मात्र तरीही रात्री वीजपुरवठा सुरू न केल्याने रहिवाशांनी मंगळवारी (ता. १३) सकाळी पुन्हा कार्यालयावर धडक दिली. रहिवाशांच्या रोषापुढे नमते घेत अखेर दुपारी १२ वाजल्यापासून सिद्धार्थ कॉलनीचा वीजपुरवठा पूर्ववत सुरू करण्यात आला. आमच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडल्याबद्दल व आतापर्यंतच्या आंदोलनात साथ दिल्याबद्दल त्यांनी ‘सकाळ’चे आवर्जून आभार मानले.

बिल भरूनही अंधार
तीन ते आठ हजार रुपयांहून अधिक बिल असतानाही १८०० हून अधिक घरधारकांनी वीज बिल भरले. तरीही कंपनीने वीजपुरवठा सुरू करण्यास नकार दिला होता. अखेर रहिवाशांच्या आक्रमकतेपुढे कंपनी नमली.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: electricity supply start in siddhart colony