Thane News: ठाणे जिल्ह्यात वीज गुल! कल्याण, बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगरमध्ये फटका

Electricity Cut: ठाणे जिल्ह्यातील विविध भागांत वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे त्याचा फटका कल्याण, बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगरसह वज्रेश्वरी परिसरातील अनेक गावांना बसला असल्याचे समोर आले आहे.
electricity
electricity sakal
Updated on

बदलापूर : पडघा येथील महापारेषणच्या वीजवाहिनीत सकाळी साडेदहाच्या सुमारास तांत्रिक बिघाड झाल्याने ठाणे जिल्ह्यातील विविध भागांत सोमवारी वीजपुरवठा खंडित झाला. त्याचा फटका कल्याण, बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगरसह वज्रेश्वरी परिसरातील अनेक गावांना बसला. वीजवाहिनीच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर करण्यात आले, परंतु रात्री उशिरापर्यंत अनेक भागांत व्होल्टेज कमी असल्याने नागरिकांची गैरसोय झाली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com