मराठा विद्यार्थ्यांना फी सवलतीचा विचार, अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याच्या हालचाली

मराठा विद्यार्थ्यांना फी सवलतीचा विचार, अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याच्या हालचाली
Updated on

मुंबई, ता.13 : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यामुळे विविध अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया रखडली आहे. अकरावी प्रवेशाची प्रक्रिया थांबविण्यात आली आहे. यामुळे पहिले सत्र संपले तरी यंदाची प्रवेशप्रक्रिया पूर्ण झालेली नाही. यामुळे विद्यार्थी, पालक चिंतेत असल्याने अकरावी प्रवेश प्रक्रियेतील अडसर दूर करण्याचा प्रयत्न शिक्षण विभागाकडून सुरू आहे. त्यानुसार मराठा समाजातील विद्यार्थ्यांना फी सवलत देण्यासह विविध पर्याय उपलब्ध करून देण्याची तयारी शिक्षण विभागाने केली आहे.

मराठा आरक्षणप्रश्नी शासनस्तरावर निर्णयप्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे अकरावीची प्रवेश प्रक्रिया रखडली आहे. प्रवेशाची पहिली फेरी राबविल्यानंतर प्रवेश थांबविण्यात आले आहेत. यामुळे शिक्षक, पालक आणि विद्यार्थी शिक्षण विभागाच्या निर्णयाकडे डोळे लावून बसली आहे. दहावी परीक्षेनंतर विद्यार्थी शिक्षणापासून दूर आहेत. प्रवेशप्रक्रियाच सुरू न झाल्याने विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाची पायरी चढण्याचे स्वप्न अपुर्ण राहिले आहे. अभ्यासाबरोबरच अकरावीच्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयाच्या पहिल्याच वर्षी फेस्टीव्हल आणि डेजलाही मुकावे लागणार आहे.

एसईबीसी आरक्षणातील विद्यार्थ्यांनी खुल्या प्रवर्गातून प्रवेश घेतल्यास त्यांना अकरावीच्या फीमध्ये सवलत देण्याचा किंवा त्यांची फी माफ करण्याचा विचार शिक्षण विभागातील अधिकारी करत आहेत. त्याचबरोबर एसईबीसी गटातील विद्यार्थ्यांना ईडब्लूएस प्रवर्गातून प्रवेशाची संधी देण्याबाबतचा पर्यायही उपलब्ध करून देण्यावर भर आहे. तसेच विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना लागू करता येईल का याची चाचपणीही शासनस्तरावर सुरू असून लवकरच अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू होईल, असे शिक्षण संचालनालयातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

अकरावी प्रवेश प्रक्रिया ठप्प असल्याने पालक आणि विद्यार्थी तणावात आहेत. त्यांना सरकारने तातडीने दिलासा देणे अपेक्षित आहे. सरकारदरबारी वारंवार पाठपुरावा केल्यानंतरही त्याला उत्तर मिळत नसल्याने खेद वाटतो, असे शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे यांनी सांगितले.

( संपादन - सुमित बागुल )  

eleventh admission process may start maratha students may get concession in fees

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com