esakal | "राज्यपाल पदावर बसलेल्या व्यतीच्या वागण्यावर खेद वाटतो"; शरद पवारांचं थेट मोदींना पत्र
sakal

बोलून बातमी शोधा

"राज्यपाल पदावर बसलेल्या व्यतीच्या वागण्यावर खेद वाटतो"; शरद पवारांचं थेट मोदींना पत्र

पत्राची भाषा आक्षेपार्ह असल्याचं मत शरद पवार यांनी मोदींना लिहिलेल्या पात्रात म्हंटल आहे.

 

"राज्यपाल पदावर बसलेल्या व्यतीच्या वागण्यावर खेद वाटतो"; शरद पवारांचं थेट मोदींना पत्र

sakal_logo
By
सुमित बागुल

मुंबई : राज्यातील मंदिरं खुली करण्यासाठी आज महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक खरमरीत पत्र धाडलं. केवळ पत्रचं धाडलं नाही तर त्यानंतर ते पत्र नंतर माध्यमांना देखील दिलं गेलं. या पत्रामध्ये ठाकरे सरकारला हिंदुत्ववादाची आठवण करून देण्यात आली आणि राज्यातील मंदिरं अजूनही बंद कशाला असा खडा सवाल विचारण्यात आला. 

दरम्यान राज्यपालांच्या खरमरीत पात्राला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तेवढंच खरमरीत उत्तर दिलं गेलं. एकीकडे कोरोना आणि एकीकडे राज्यातील गरमागरमीचं राजकारण हे महाराष्ट्रासाठी आता नवीन राहिलेलं नाही. राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांमधील या लेटरवॉर बाबत आज मोठ्या प्रमाणात राजकीय प्रतिक्रिया आल्यात. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी तर आज मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना पाठवलेलं पत्र म्हणजेच ऐतिहासिक दस्ताऐवज असल्याचं म्हटलंय. 

या वादामध्ये आता शरद पवारांनी आपली बाजू मांडली आहे. राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना लिलीलेल्या पात्राबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं आहे. शरद पवारांनी नरेंद्र मोदी यांना पत्र लिहीत आपली नाराजी व्यक्त केलीये. 

महत्त्वाची बातमी : अनिल परब यांना तातडीने लिलावतीमध्ये हलवलं, मुख्यमंत्र्यांनी रद्द केली मातोश्रीवरील बैठक

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राज्यपालांच्या वर्तनाबद्दल आक्षेप नोंदवत नाराजी व्यक्त केली आहे. राज्यपाल पदावर बसलेल्या व्यतीच्या वागण्यावर खेद वाटतो, असं पवार म्हणालेत. पवारांनी मोदींना लिहिलेल्या पत्रात राज्यपाल कोश्यारी यांनी उद्धव ठाकरे यांना उद्देशून मांडलेल्या मुद्द्यांचा खेद वाटत असल्याचं नमूद करत पत्रात ज्या 'धर्मनिरपेक्ष' आणि 'हिंदुत्त्ववाद' या शब्दांशी निगडित उल्लेख आहेत यावर शरद पवारांनी आक्षेप घेतलाय.

पत्राची भाषा आक्षेपार्ह असल्याचं मत शरद पवार यांनी मोदींना लिहिलेल्या पात्रात म्हंटल आहे. राज्यपालांना आपले विचार मांडण्याचा लोकशाहीत अधिकार आहे. मात्र हे पत्र उद्धव ठाकरे यांना दिल्यानंतर ते प्रसारमाध्यमांना देण्यात आलं, सोबतच या पत्रातील भाषा ही राज्यपाल पदावरील व्यक्तीला न शोभणारी आहे असं शरद पवार म्हणालेत. सोबतच हे पत्र एखाद्या राजकीय पक्षाच्या अध्यक्षांनी लिहावं अशी या पात्रातील भाषा असल्याचा उल्लेखही शरद पवार यांनी मोदींना लिहिलेल्या पत्रात केलाय.

महत्त्वाची बातमी : आशिष शेलार यांना धमकीचे फोन; पोलिसांच्या चौकशी नंतर दोघांना अटक

शरद पवारांनी आपल्या पत्रासोबत राज्यपालांनी लिहिलेलं पत्र देखील सोबत जोडलं आहे. 

NCP chief sharad pawar writes letter condemning letter written by koshyari to uddhav thackeray