एल्गार परिषद प्रकरण; एनआयएचे 8 जणांविरोधात आरोपपत्र दाखल

सुनिता महामुणकर
Friday, 9 October 2020

भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात आज राष्ट्रीय तपास पथकाने (एनआयए) विशेष न्यायालयात प्रा. आनंद तेलतुंबडे, विचारवंत गौतम नवलखा यांच्यासह आठ जणांविरोधात पुरवणी आरोपपत्र आज दाखल केले.

मुंबई : भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात आज राष्ट्रीय तपास पथकाने (एनआयए) विशेष न्यायालयात प्रा. आनंद तेलतुंबडे, विचारवंत गौतम नवलखा यांच्यासह आठ जणांविरोधात पुरवणी आरोपपत्र आज दाखल केले.

तोतया आयपीएस अधिकाऱ्यास अटक; व्यावसायिकाचे अपहरण करत उकळली 16 लाखांची खंडणी

पुण्यातील एल्गार परिषद आणि भीमा कोरेगाव प्रकरणात पुणे पोलिसांनी यापूर्वी आरोपपत्र दाखल केले आहे. मात्र एनआयएकडे तपास आल्यानंतर त्यांनी आता पहिले आरोपपत्र दाखल केले आहे. आरोपी प्रा आनंद तेलतुंबडे, गौतम नवलखा, प्रा हनी बाबू, सामाजिक कार्यकर्ते  सागर गोरखे, रमेश गायचोर आणि ज्योती जगताप, झारखंडमधील समाजसेवक  फादर स्टैन स्वामी यांच्याविरोधात सुमारे दहा हजार पानी आरोपपत्र दाखल केले आहे. त्याशिवाय फरार आरोपी मिलिंद तेलतुंबडे याचाही यामध्ये समावेश आहे.

पालघर जिल्ह्यातील पर्यटनस्थळे गजबजली; हॉटेल व्यावसायिकांचा पुनश्‍च हरिओम 

पुणे पोलिसांनी नऊजणांविरोधात आरोपपत्र दाखल केले होते. रांचीहून काल अटक केलेल्या 83 वर्षी स्वामीला आज न्यायालयात रिमांडसाठी हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला ता. 23 पर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे निर्देश दिले. पोलिसांनी त्याला तळोजा कारागृहात ठेवले आहे. झारखंड मधील आदिवासींच्या विकासासाठी स्वामी यांनी काम केले आहे. काल त्यांची सुमारे वीस मिनिटे चौकशी करून त्यांना बगाईत येथील निवासस्थानी अटक करण्यात आले होते.

'एफडीए'ची मोठी कारवाई! तब्बल 35 लाखांचा पान मलासा जप्त; अवैध वाहतूक करणार्‍यांवर दक्षता पथकाचा छापा

सन 2017 मध्ये पुण्यात झालेल्या एल्गार परिषदेमुळे भीमा कोरेगावमध्ये 1 जानेवारी 2018 मध्ये हिंसाचार झाला, असा आरोप केला आहे. माओवादी संघटनांशी संबंध असणे, त्यांना आर्थिक सहाय्य देणे,  देशविरोधी कारवाया करणे आदी गंभीर आरोप तपास यंत्रणेने ठेवले आहेत.

----------------------------------------------------- 

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Elgar Council case Chargesheet filed against 8 persons of NIA