esakal | आरोपी सुधा भारद्वाज यांच्या मागणीवर भूमिका स्पष्ट करा- हायकोर्ट
sakal

बोलून बातमी शोधा

sudha bharadwaj

आरोपी सुधा भारद्वाज यांच्या मागणीवर भूमिका स्पष्ट करा- हायकोर्ट

sakal_logo
By
सुनिता महामुनकर

मुंबई : एल्गार परिषद (elgar parishad) प्रकरणातील आरोपी सुधा भारद्वाज (sudha Bharadwaj) यांच्यासह दोघांनी केलेल्या डिजिटल पुराव्यांच्या (digital evidence) छायांकित प्रतींच्या मागणीवर दोन आठवड्यात भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश (order) मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai high court) आज एनआयएला दिले.

हेही वाचा: रत्नागिरीच्या आंबा उत्पादकांच्या पीक कर्जाचे पुनर्गठन करणार - मुख्यमंत्री

भारद्वाज आणि गौतम नवलाखा यांनी एन आय एकडे असलेल्या डिजिटल पुराव्याच्या कागदपत्रांच्या क्लोन प्रती देण्याची मागणी केली आहे. एनआयएने आरोपींना अटक करताना त्यांच्याकडिल संगणक, हार्ड डिस्क इ. साहित्य जप्त केले आहे. या कागदपत्रांचा वापर तपासात करण्यात येणार आहे. त्यामुळे या डिजिटल कागदपत्रांचा प्रती मिळण्याची मागणी करणारी याचिका भारद्वाज आणि नवलाखा यांनी केली आहे.

न्या एस एस शिंदे आणि न्या एन जे जमादार यांच्या खंडपीठापुढे याचिकांवर आज सुनावणी झाली. एन आय एने आज पुन्हा यावर भूमिका मांडण्यासाठी अवधी मागितला. न्यायालयाने ही मागणी मान्य केली आणि दोन आठवड्याचा अवधी मंजूर केला. यापूर्वी देखील न्यायालयाने एनआयएला बाजू मांडण्याचे निर्देश दिले होते.

न्यायालयात लवकरच आरोपींवर आरोप निश्चित केले जाणार आहेत. त्यापूर्वी आरोपींना ही कागदपत्रे मिळायला हवी अशी मागणी याचिकेत केली आहे. आरोपींकडून जप्त केलेली इलेक्ट्रॉनिक साहित्य आणि खटल्यात दाखल केली जाणारी कागदपत्रे याबाबत संभ्रम आहे, त्यामुळे तपास यंत्रणेने यावर खुलासा करावा, असे आरोपींच्या वतीने एड युग चौधरी यांनी खंडपीठाला सांगितले. मात्र एन आय एकडून याचे खंडन करण्यात आले. तपास अधिकारी याचा निर्णय घेतील, आरोपी यामध्ये सूचना करु शकत नाही, असा युक्तिवाद अतिरिक्त सौलिसिटर जनरल अनील सिंह यांनी केला. याचिकेवर पुढील सुनावणी ता. 24 रोजी होणार आहे. एल्गार परिषद प्रकरणात पंधरा आरोपी अटकेत आहेत.

loading image
go to top