गुणपत्रिकांवर ‘अनुत्तीर्ण’ऐवजी ‘कौशल्य विकासास पात्र’

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 डिसेंबर 2019

मुंबई : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या दहावी व बारावीच्या परीक्षांत अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. यापूर्वी गुपत्रिकेवर येणारा ‘अनुत्तीर्ण’ हा शेरा हटवून ‘कौशल्य विकासास पात्र’ असा शेरा देण्यात येईल. याबाबतचा शासन निर्णय कौशल्य विकास व उद्योजकता विभागाने जारी केला असून, तसा प्रस्ताव राज्य शिक्षण मंडळाला पाठवण्यात आला आहे.

दहावी आणि बारावीच्या परीक्षांत अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्‍वास निर्माण व्हावा आणि त्यांना स्वत:च्या पायावर उभे राहता यावे, हा या निर्णयामागील हेतू आहे. त्यासाठी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना रोजगारक्षम कौशल्य विकास प्रशिक्षण देण्याचा निर्णय कौशल्य विकास व उद्योजकता विभागाने घेतला. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना रोजगारक्षम करण्यासाठी कौशल्य सेतू कार्यक्रम योजना राबवण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. 

त्यानुसार यापुढे दहावी आणि बारावीच्या परीक्षांत तीन किंवा त्यापेक्षा अधिक विषयांत अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना गुणपत्रिकेवर ‘अनुत्तीर्ण’ शेरा न देता ‘कौशल्य विकासास पात्र’ असे नमूद करण्यात येईल. 

रोजगारक्षम कौशल्य विकास प्रशिक्षण
शिक्षण विभागाच्या निर्णयानंतर कौशल्य विकास व उद्योजकता विभागाने दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. त्यानुसार दहावी व बारावीच्या परीक्षांत अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना रोजगारक्षम कौशल्य विकास प्रशिक्षण देण्याची योजना महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास संस्था व महाराष्ट्र राज्य व्यवसाय प्रशिक्षण परिषद यांच्यामार्फत राबवण्यात येणार आहे.

विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण न करण्याची घोषणा झाली; मात्र अनेक विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नव्हते. आता राज्यातील सर्व शाळांचा निकाल १०० टक्के लागेल असे वाटते.
- प्रशांत रेडीज, सचिव, मुंबई मुख्याध्यापक संघटना

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Eligible FOR Skills Development' rather than 'Failed' on the scoreboards