

Elphinstone Bridge Construction
ESakal
मुंबई : मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील परळ आणि प्रभादेवीला जोडणारा १२५ वर्ष जुना ब्रिटिशकालीन एल्फिन्स्टन पूल तोडण्यात आला आहे. पण पूल लागतच्या इमारतीच्या पुनर्वसनाबाबत अद्याप तोडगा निघाला नाही. रहिवाशांना दिलेल्या दोन पर्यायापैकी एकीकडे पाणी नाही तर दुसरीकडे नूतनीकरण बाकी आहे, असे असताना एमएमआरडीएने घरे खाली करण्याचा तगादा लावला आहे. त्यामुळे रहिवाशी आक्रमक झाले असून त्यांनी पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. तसेच येत्या ३१ पर्यंत स्थलांतर करण्यास मुदत देण्याची मागणी केली आहे.