

Elphinstone Bridge Construction
Esakal
मुंबई : वरळी-शिवडी कनेक्टरसाठी एमएमआरडीएकडून एल्फिन्स्टन येथे रेल्वे क्राॅसिंगवर डबलडेकर पूल उभारला जाणार आहे. त्यासाठीच्या पायलिंगचे काम सुरू झाल्याने पुलालगतच्या इमारतींना हादरे बसत असल्याच्या तक्रारी आहेत. त्या पार्श्वभूमीवर पायलिंग करतेवेळी इमारतींना बसणाऱ्या हादऱ्यांची तीव्रता मोजण्यासाठी एमएमआरडीच्या कंत्राटदाराने व्हीजेटीआयच्या तज्ज्ञांची नियुक्ती केली आहे. त्यानुसार त्यांनी कामाच्या ठिकाणी जाऊन पाहणी केली आहे.