देशात चोर पावलाने येतेय आणीबाणी - उद्धव ठाकरे

thackeray
thackeray

मुंबई: देशात चोर पावलांनी आणीबाणी येते आहे. आणि लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाची गळचेपी होत असल्याची वातावरण निर्मिती केली जात आहे. असे असतानाही पत्रकारांनी आपल्या सोई सुविधेचा मुद्दा लावून धरला आणि यशस्वी करुन दाखविला. असे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांचे कौतुक करताना केन्द्रातील मोदी सरकारवर निषाणा साधला. काल (मंगळवार) मुंबई महानगर पालिका पत्रकार संघाच्या अद्ययावत वातानुकूलित संगणिकृत कक्षाच्या उदघाटन समारंभ प्रसंगी ते बोलत होते.

उपस्थितांना संबोधित करताना उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, ''देशाच्या सामर्थ्याने इतिहास घडविणाऱ्या शिवसेनाप्रमुखांचा मी मुलगा आहे. तुम्हाला हेडलाईनसाठी ओळ नक्कीच मिळेल. असे सांगताना ते म्हणाले की, एक दिशा घेऊन पुढे निघालो आहे. साहजीकच कोणाला पटतेय कोणाला पटणार नाही. अयोध्येचा दौरा 25 तारखे पासून आहे. तेथे गेल्यावर बोलणारच आहे. काही जनांणी प्रश्न विचारलाय की, नेमका आत्ताच हा निवडणुकीच्या तोंडावर मुद्दा का उचलला आहे. होय हा मुद्दा निवडणूक समोर घेऊनच उचललाय. मी कशाला लपवू. आता पर्यंत 20 ते 25 वर्षे झालीत. हाच मुद्दा येतोय याही निवडणुकीत येईल. निवडून आलात की विसरणार. मुद्दाम आठविलेला हा मुद्दा नाहिये. कोणाला तरी आठवण देण्याकरिता हा मुद्दा घेतलाय. साड़ेचार वर्षे झाली, आता 5 महीन्यात जर करु शकत नसाल तर मग लोकांसमोर कशाला सांगता की पुन्हा निवडून आल्यानंतर, सरकार आल्यानंतर राम मंदिर बनवू. त्याच करिता मी नारा दिलाय "पहले मंदिर फिर सरकार" असे म्हणत ठाकरे यांनी मोदींचे आणि भाजपाचे नाव न घेता त्यांना टोला हाणला.

लोकांची आमच्याशी बांधिलकी आहे. कोस्टल रोड, अन्य सोई सुविधा आम्ही दिल्या. मुंबईचे व शिवसेनेचे नगरसेवक चांगले काम करतात म्हणूनच मुंबईची जनता त्यांच्यावर पुन्हा विश्वास ठेवते. पत्रकार हे फक्त बातमीदार नसून वर्तमानात घडणाऱ्या घटनांचे उद्याचे साक्षीदार आहेत असे म्हणत त्यांनी पत्रकारांची स्तुती केली. आमचे काही चुकत असेल तर चूक लक्षात आणून दया. मुंबई आपल्या सर्वांची आहे. चांगले घडविण्याचे तुम्ही एक घटक आहात. आपण मिळून जर चांगले काम केले, तर मुंबईची जनता आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाहीत. असे म्हणत मुंबईच्या विकासाकरिता सर्वांनीच हातभार लावण्याचे आवाहन ठाकरे यांनी केले. 

मुंबई मनपा पत्रकार संघाचे अध्यक्ष विष्णु सोनावणे यांनी उद्धव ठाकरे यांचे संघातर्फे स्वागत केले. व्यासपिठावर महापौर विश्वनाथ महाडेश्वर, आयुक्त अजोय मेहता, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, सभागृह नेत्या विशाखा राऊत उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्र संचालन टीव्ही पत्रकार मनश्री पाठक यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com