मराठा आरक्षणासाठी दिल्लीत खलबते; अमित शहांनी बोलावली तातडीची बैठक

Emergency meeting convened by Amit Shah in Delhi
Emergency meeting convened by Amit Shah in Delhi

मुंबई : सध्या राज्यात मराठा आरक्षणावरून राज्यात वातावरण पेटलेले असताना आता महाराष्ट्र निघणाऱ्या या ठोक मोर्चाची दखल दिल्लीत देखील घेतल्याचे पहायला मिळत आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आज दिल्लीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासह महाराष्ट्रातील मराठा खासदारांची तातडीची बैठक बोलवल्याची माहिती मिळत आहे. या बैठकीत राज्य प्रभारी सरोज पांडे देखील उपस्थित राहणार आहेत. दरम्यान यावेळी मराठा आरक्षणासोबत धनगर आणि मुस्लिम आरक्षणाबाबत देखील चर्चा होण्याची शक्यता आहे.

कायदेशीर प्रक्रिया नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करणार - 
राज्य मागास आयोग स्वायत्त आहे त्यामुळे सरकार त्यामुळे सरकार कोणताही दबाव टाकू शकत नाही मात्र मराठा आरक्षणाबाबतची कायदेशीर प्रक्रिया ही नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करू असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी सांगितले होते. तसेच आरक्षणाची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मेगा भरतीला स्थगिती देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले होते. याच बरोबर मराठा आरक्षणासोबत धनगर समाजाच्या आरक्षणावर देखील राज्य सरकारने टीआयएसएसला अभ्यास करायला सांगितल्याचे त्यांनी सांगितले होते.  

दिल्लीतही जंतरमंतरवर मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलन - 
दरम्याम राज्यात मराठा आरक्षणासाठी विविध ठिकाणी मराठा क्रांती मोर्चाची आंदोलन सुरु असताना आणि फडणवीस सरकार समाजाच्या मागण्या मान्य करत नाही म्हणून आता मराठा क्रांती मोर्चाने दिल्लीकडे कूच केली असून, जंतर मंतरवर अनेक मराठा संघटना महाराष्ट्रातून दिल्लीमध्ये दाखल झाले आहेत, असे सांगितले जाते.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com