Dr. Rajnish Kamat : महिलांसाठी विशेष कार्यक्रमांवर भर हवा

देशातील उच्च शिक्षण संस्था आणि विद्यापीठांमध्ये महिलांची संशोधक महिलांचे फार मोठे योगदान राहिलेले आहे.
Dr. Rajnish Kamat
Dr. Rajnish Kamatsakal

मुंबई - देशातील उच्च शिक्षण संस्था आणि विद्यापीठांमध्ये महिलांची संशोधक महिलांचे फार मोठे योगदान राहिलेले आहे. ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात त्यांनी मोठी झेप घेताना आपण पाहतोय. आता देशात राष्ट्रीय शैक्षण‍िक धोरणाची अंमलबजावणी सुरू झाली असल्याने या संशोधक महिलांचे स्थान अधिक मोठ्या प्रमाणात अधोरेखित होण्यासाठी विद्यापीठ आणि उच्च शिक्षण स्तरावर अधिक उपक्रमांची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रजनीश कामत यांनी केले.

अमेरिकन इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी लॉ असोसिएशन (ऐआयपीएलए) च्यावतीने आयोजित 'वूमन इन आयपी-ग्लोबल नेटवर्क' या परिषदेचे प्रमुख अतिथी म्हणून कामत यांनी संबोधित केले.डक्सलेजिस ॲटर्नीज या बौध्दिक संपदा क्षेत्रातील अग्रणी संस्थेने ऐआयपीएलएचे प्रतिनिधी या नात्याने या परिषदेचे मुंबईत आयोजन केले होते. 'नेतृत्व जोपासना' ही या वर्षीच्या परिषदेची संकल्पना होती.

या परिषदेस ज्येष्ठ पत्रकार राही भिडे, रिस्पान्सिबल नेटिझम य़ा सायबर सुरक्षा क्षेत्रातील चळवळीच्या संस्थापक सोनाली पाटणकर बौध्दिक संपदा क्षेत्रातील ज्येष्ठ तज्ञ्ज रश्मी मिश्रा व आशा होले यांनीही या परिषदेस संबोधित केले. डक्सलेजिस ॲटर्नीजचे प्रमुख दिव्येंदू वर्मा यांनी या परिषदेच्या आयोजनामागील भूमिका विषद केली.

कुलगुरू डॉ. कामत यांनी संशोधनाच्या क्षेत्रात स्त्री पुरूष समानता येण्यास २०७७ साल उजाडेल, अशी शक्यता वर्तविणा-या जागतिक बौध्दिक संपदा संघटनेच्या अहवालाचा हवाला देत महिलांना संशोधन क्षेत्रात वाव निर्माण व्हावा यासाठी विद्यापीठे समाज यांनी या क्षेत्रातील आपली गुंतवणूक वाढविणे गरजेचे असल्याचे मत नोंदविले.

राही भिडे यांनी यावेळी बोलताना नेतृत्वाची जडणघडण वा जोपासना करण्यासाठी कोणती कौशल्ये महत्वाची आहेत, हे त्यांच्या ४ दशकांच्या राजकीय पत्रकारितेच्या आधारावर स्पष्ट केले.

'नेत्याने नव्या गोष्टींचे, ज्ञानाचे स्वागत करण्यास तयार असावे, नवी कौशल्ये आत्मसात करण्याची जीवनभर तयारी ठेवायला हवी. स्वतःच्या उदाहरणातून नेतृत्वाने इतरांना प्रेरणा द्यावी,' असे भिडे यांनी सांगितले. पाटणकर यांनी मुलांच्या सायबर सुरक्षेबाबत समाज व सरकारांनी गंभीर होण्याचे व सर्वत्र सायबर वेलनेस केंद्र स्थापन करण्याचे आवाहन केले. याबाबतचे अनुभवही त्यांनी सांगितले.

महिलांमधील नेतृत्व गुणाला वाव देण्यासाठी समाजाने, संस्थेतील सहका-यांनी प्रोत्साहन देण्याची व महिलांच्या अडचणी समजून घेऊन त्यांना सहकार्य करण्याची तयारी दाखविण्याची गरज असल्याचे मत जेनियोब्रेन आयपी सोल्यूशनच्या संस्थापक आशा होले यांनी व्यक्त केले.

महिला आर्थिक क्षेत्रात मोठे योगदान देत असून त्यांच्या योगदानाची योग्य दखल घेतली जात नसल्याबद्दल एसीजी समुहाच्या प्रमुख कौन्सेल रश्मी मिश्रा यांनी खंत व्यक्त केली.डक्सलेजिजच्या प्रीती जाधव यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com