'जुन्या पेन्शन योजने'साठी कर्मचारी एकवटले, राष्ट्रीय निषेध दिन पाळून करणार निर्दशने

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जून 2020

अंशदयी पेन्शन योजना असणाऱ्या मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना 10 लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याबाबत ग्रामविकास विभाग शासन निर्णय प्रसारित करावे अशी मागणीही संघटनेने केली आहे. 

ठाणे : अंशदायी पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी तसेच कंत्राटी तथा मानधनावरील कर्मचाऱ्यांना सेवेत नियमित करण्यात यावे, तसेत रिक्त पदे तात्काळ भरावी, यांसारख्या विविध मागण्यांसाठी 3 जुलै रोजी राष्ट्रीय निषेध दिन पाळून दुपारच्या जेवणाच्या सुट्टीत निदर्शने करण्यात येणार असल्याची, माहिती राज्य सरकारी कर्मचारी संघटनेच्या वतीने देण्यात आली. 

महत्वाची बातमी : वेब सीरिज बघताय जरा सावध व्हा, नाहीतर तर होऊ शकतं हे...

कोरोना योद्ध्यांच्या सुरक्षिततेसाठी पुरेसे पीपीई किट, हातमोजे, मास्क, रबराचे बूट, आणि फेस शील्ड यांचा त्वरित पुरवठा करणे. तसेच विमा मुदतवाढ व कोरोनाच्या संकटात लढणाऱ्या कर्मचाऱ्यांचे मार्चमध्ये कपात केलेले 25 टक्के वेतन त्वरित निर्गमित करावेत. यारख्या विविध मागण्या देखील संघटनेतर्फे करण्यात आल्या आहेत. तसेच अंशदयी पेन्शन योजना असणाऱ्या मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना 10 लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याबाबत ग्रामविकास विभाग शासन निर्णय प्रसारित करावे अशी मागणीही संघटनेने केली आहे. 

ही बातमी वाचली का? मुंबईकर... मास्क लावा, नाहीतर हजार रुपये तयार ठेवा...

यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व बंधने पाळून कमी आंदोलनकर्त्यांच्या उपस्थितीत ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात येणार आहेत.

- भास्कर गव्हाळे, सरचिटणीस, राज्य सरकारी कर्मचारी संघटना

Employees gather for Old Pension Scheme, will observe National Protest Day


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Employees gather for Old Pension Scheme, will observe National Protest Day