मुंबईकर... मास्क लावा, नाहीतर हजार रुपये तयार ठेवा...

सकाळ वृत्तसेवा 
मंगळवार, 30 जून 2020

नियम न पाळणाऱ्या नागरिकांसाठी पालिकेनं नवे नियम आणलेत. मास्क वापरण्या संदर्भात मुंबई महानगरपालिकेनं नवा आदेश जारी केला आहे.

 

मुंबई- कोरोना व्हायरसनं सर्वत्र थैमान घातलं आहे. कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासनाकडून विविध पातळीवर प्रयत्न केले जाताहेत. मुंबईत या व्हायरसचा प्रार्दुभाव सर्वाधिक आहे. अशातच नागरिकांना मास्क लावणं बंधनकारक करण्यात आलं आहे. मात्र बरेच नागरिक नियमांची पायपल्ली करताना आढळताना. याच नियम न पाळणाऱ्या नागरिकांसाठी पालिकेनं नवे नियम आणलेत. मास्क वापरण्या संदर्भात मुंबई महानगरपालिकेनं नवा आदेश जारी केला आहे. यापुढे जे नागरिक मास्क वापरणार नाहीत त्यांना एक हजार रुपये दंड भरावा लागणार आहे. 

मुंबई परिसरातील बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मुंबईत दरदिवशी जवळपास एक हजार कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात येत आहे. मुंबईत दोन महिन्यांच्या लॉकडाऊननंतर हळहळू स्थिती पूर्वपदावर येत आहे. मात्र असंख्य नागरिक मास्क न लावता बाहेर फिरत असल्याचे आढळून येते आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग अधिक वाढण्याची शक्यता आहे. काही नागरिक पुरेशी खबरदारी घेत नसल्याने त्यांची वैयक्तिक आणि इतरांचीही सुरक्षितता त्यामुळे धोक्यात येत असल्याचं दिसून आलं आहे. या पार्श्वभूमीवर, महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी सोमवारी एक परिपत्रक प्रसिद्ध करून कारवाईचे आदेश दिलेत. पालिका प्रशासनाने दिलेल्या निर्देशांचे उल्लंघन करणाऱ्यांवर भारतीय दंड संहिता कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल.

ठाण्यातील लॉकडाऊनबाबत सावळा गोंधळ, पोलिस आणि महापालिकेत समन्वय नाही का ?

सार्वजनिक स्थळं, प्रवास यासह खासगी वाहनांमध्येही प्रवास करताना मास्क लावणे बंधनकारक असल्याचे निर्देश महानगरपालिका प्रशासनाने दिले केले आहेत. या निर्देशांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून एक हजार रुपये दंड वसूल करण्यासह भारतीय दंड संहितेनुसार कारवाई करण्याचाही इशारा देण्यात आला आहे. पोलिस तसेच महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तांनी नेमलेल्या अधिकाऱ्यांना ही दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. 

प्रमाणित (स्टँडर्ड) मास्क, तीन स्तरांचे (थ्री प्लाय) मास्क किंवा औषध दुकानदारांकडे उपलब्ध असलेले साध्या कापडाचे मास्क यासह घरगुती तयार केलेले, निर्जंतुकीकरण करून वारंवार वापरात येणारे मास्क यांचाही उपयोग नागरिक करू शकतात. 

मुंबईत वाहतूक पोलिसांची कारवाई सुरूच; तब्बल 'इतकी' वाहनं केली जप्त..

महापालिकेच्या निर्देशांनुसार, कोणत्याही कारणासाठी रस्ते, कार्यालये, दुकाने, बाजार, दवाखाने, रुग्णालये यासारख्या सार्वजनिक स्थळी वावरताना प्रत्येक नागरिकाने मास्क लावणे बंधनकारक आहे. कार्यालयीन वापराच्या किंवा खासगी वाहनातून प्रवास करतानादेखील प्रत्येकाने मास्क लावणे आवश्यकच असणार आहे. कोणत्याही बैठकीला किंवा एकत्र येताना तसेच कार्यस्थळी मास्क लावल्याशिवाय उपस्थित राहणे हे नियमांच्या विरुद्ध मानले जाणार आहे. सार्वजनिक वाहतूक साधनांमधून प्रवास करतानाही मास्क लावणे गरजेचे आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: covid19 in mumbai not wearing a mask shell out rs 1000 says bmc