उल्हासनगर - तत्कालीन आयुक्त विकास ढाकणे यांनी अमलात आणलेल्या आदर्श शाळांच्या संकल्पनेला गती देण्यासाठी उल्हासनगर महानगरपालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला आयुक्त पदाचा पदभार हाताळण्याऱ्या मनिषा आव्हाळे यांनी कंबर कसली आहे. त्यांनी केलेल्या पाहणीत शाळांच्या परिसरात आढळलेली अतिक्रमणे अनधिकृत बांधकाम निष्कासन विभागाचे नोडल अधिकारी गणेश शिंपी यांनी जमीनदोस्त केली आहेत.
काही दिवसांपूर्वी आयुक्त मनिषा आव्हाळे यांनी आदर्श शाळांचा पाहणी दौरा केला होता. त्यावेळी त्यांच्या निदर्शनास शाळांच्या परिसरात अतिक्रमणे असल्याने तिथे विद्रुपीकरण होत असल्याची बाब निदर्शनास आली होती. त्याचवेळी त्यांनी संबंधित विभागाला ही अतिक्रमणे हटवण्याचे आदेश दिले होते.
त्यानुसार अतिरिक्त आयुक्त किशोर गवस यांच्या मार्गदर्शनाखाली अनधिकृत बांधकाम निष्कासन विभागाचे नोडल अधिकारी गणेश शिंपी यांनी शाळा क्रमांक 8 येथील अनधिकृत दुकान व शाळा क्रमांक 17 येथील शाळेच्या प्रवेशद्वारालगत असलेले रुमचे बांधकाम जमीनदोस्त केले आहे.
आयुक्त मनिषा आव्हाळे यांनी सर्व सहायक आयुक्तांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील मनपा शाळांच्या परिसरात अनधिकृत बांधकाम आढळून आल्यास त्यावर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.