प्रीपेड वीजबिल वसुलीची ‘सरकारी एन्ट्री’! वीजजोडण्या बदलण्यास ऊर्जा विभागाची मंजुरी

Electricity Supply: ऊर्जा विभागाने सरकारी मार्गाने प्रीपेड देयक प्रणाली सुरू केली आहे. याअंतर्गत सर्व सरकारी कार्यालयांमधील वीजजोडण्या प्रीपेडमध्ये बदलण्यास ऊर्जा विभागाकडून मंजुरी देण्यात आली आहे.
Electricity

Electricity

Sakal
Updated on

बापू सुळे

मुंबई : राज्यभरातील वीज ग्राहकांकडून महावितरणच्या स्मार्ट मीटरला कडाडून विरोध होत असताना, ऊर्जा विभागाने आता ‘सरकारी’ मार्गाने प्रीपेड देयक प्रणाली सुरू करण्याचा घाट घातला आहे. स्मार्ट मीटर लागलेल्या सर्व सरकारी कार्यालयांमधील वीजजोडण्या १ एप्रिलपासून प्रीपेडमध्ये बदलण्यास ऊर्जा विभागाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे लवकरच सरकारी ग्राहकांपासून सामान्य ग्राहकांपर्यंत प्रीपेड मीटर पोहोचण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com