esakal | अनिल देशमुख व कुटुंबीय ई़डीच्या रडारवर, मालमत्ता संशयास्पद
sakal

बोलून बातमी शोधा

Anil Deshmukh

अनिल देशमुख व कुटुंबीय ईडीच्या रडारवर, मालमत्ता संशयास्पद

sakal_logo
By
अनिष पाटील

मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) आणि त्यांच्या कुटुंबीयांशी संबंधीत तब्बल चार कोटी रुपयांची मालमत्तेवर (Property) सक्तवसुली संचलनालयाने (Enforcement Directorate) टाच आणली आहे. या दोनही मालत्तांचे व्यवहार (Property Deal) संशयास्पद असल्याचा दावा ईडीकडून करण्यात आला आहे. शंभर कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणात ही कारवाई (Action) करण्यात आली आहे. यापूर्वी देशमुख यांच्या दोन निकटवर्तीयांना देखील या प्रकरणी अटक करण्यात केली होती. (Enforcement Directorate Action Against Anil Deshmukh and Family on Property issue-nss91)

ईडीने अनिल देशमुख यांची स्थावर मालमत्तेवर टाच आणली आहे. या स्थावर मालमत्तेची किंमत 4 कोटी 20 लाख रुपये इतकी आहे. ही मालमत्ता देशमुख यांची पत्नी आरती देशमुख व प्रीमियर पोर्ट लिंक प्रा. लि. या कंपनीशी संबंधीत आहे. त्यात वरळी येथील एक कोटी 54 लाख रुपयांचा फ्लॅट व रायगड जिल्ह्यातील उरण येथील धुतून गावातील जमीनीचा सहभाग असल्याचे ईडीकडून सांगण्यात आले. ईडीच्या दाव्यानुसार वरळीतील फ्लॅट हा 2004 मध्ये रोख रक्कम देऊन खरेदी करण्यात आला होता. पण त्याचे सेल डीड हे फेब्रुवारी 2020 मध्ये करण्यात आले. त्यावेळी देशमुख हे राज्याचे गृहमंत्री होते. प्रीमियर पोर्ट लिंक प्रा. लि. या कंपनीच्या मालकीचे जमीन व दुकान याची किंमत पाच कोटी 34 लाख रुपये आहे. या कंपनीचे 50 टक्के भाग देशमुख कुटुंबियांच्या मालकीचा आहे. त्यासाठी विविध कालांतराने फक्त 17 लाख 95 हजार रुपये देण्यात आल्याचे ईडीच्या तपासात निष्पन्न झाले आहे.

हेही वाचा: मुंबईत स्वाईन फ्लू ! सहा वाॅर्डात धोका वाढतोय

सचिन वाझे प्रकरणात मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची बदली झाली होती. या बदलीनंतर सिंग यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पोलिस महासंचालकांना एक पत्र लिहिले होते. या पत्रामध्ये अनिल देशमुख यांच्यावर शंभर करोड रुपये वसुलीचे आरोप लावण्यात आले होते. या लेटर बॉम्ब नंतर अनिल देशमुख यांचा गृहमंत्री पद देखील गेले होते. त्यांना राजीनामा देखील द्यावा लागला होता.संपूर्ण प्रकरणाचा तपास ईडी करत असून प्राथिमक तपासात वाझेने बार मालकांकडून घेतलेले चार कोटी 70 लाख रुपये हवाला मार्फत देशमुख यांच्या नागपूरमधील ट्रस्टमध्ये आल्याचे उघड झाले होते. त्या रकमेचा माग ईडी सध्या घेत आहे. त्यावेळी सुरू करण्यात आलेल्या तपासात या दोन मालमत्तांच्या व्यवहाराची माहिती ईडीला मिळाली होती. केंद्रीय अन्वेषण विभागाने(सीबीआय) दाखल केलेल्या गुन्ह्यांच्या आधारावर ईडीने याप्रकरणी तपासाला सुरूवात केली होती.

आरती देशमुख यांच्यावतीने ईडीला कागदपत्रे सादर

ईडीने आरती देशमुख यांना पाठवलेल्या समन्समध्ये त्या प्रतिनिधी मार्फत संबंधीत कागदपत्र ईडी कार्यालयात जमा करू शकतात, असे नमुद केले होते. त्यानुसार शुक्रवारी आरती देशमुख यांच्या वतीने त्यांच्या प्रतिनिधींनी ही कागदपत्रे जमा केली असल्याचे देशमुख कुटुंबियांचे वकील अॅड इंदरपाल सिंग यांनी सांगितले. आम्ही ईडीला तपासात संपूर्ण सहकार्य करत आहोत व यापुढेही तपास यंत्रणांना आमचे पूर्ण सहकार्य असेल. आमच्यावर लावण्यात आलेले आरोपांमध्ये तथ्य नाही, असेही सिंग यांनी यावेळी सांगितले.

loading image