अनिल देशमुख यांना तिसरं समन्स मिळालं नाहीये- इंद्रपाल सिंग

अनिल देशमुख आज दिल्लीला गेले नाही. वकील इंद्रपाल सिंग यांची माहिती
Anil Deshmukh
Anil Deshmukhsakal media
Updated on

मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सक्त वसुली संचलनालयाने( Enforcement Directorate) तिसरे समन्स बजावले आहे. अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. मात्र, ईडीकडून अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या नावाचे तिसरे समन्स अद्यापही मिळाले नाही. अनिल देशमुख हे दिल्लीला गेले नाहीत. आज सकाळी मी त्यांना भेटलो. अशी माहिती देशमुख यांचे वकील इंद्रपाल सिंग (Advocate Indrapal Singh) यांनी दिली आहे. त्यामुळे देशमुखांना ईडीकडून तिसरे समन्स बजावण्यात आलेल्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. जेव्हा ईडीने छापा टाकला त्यावेळी इन्कम टॅक्स रिटर्न्स (Income tax Return) आणि इतर काही माहिती ईडीच्या अधिकाऱ्यांनी स्वत:सोबत नेली आहे. तरीही ईडी काही कागदपत्रांची मागणी करत असेल तर आम्ही सहकार्य करायला तयार आहोत. ऋषिकेश देशमुख (Rushikesh Deshmukh) यांनाही ईडीने समन्स बजावले असून मंगळवारी ईडी कार्यालयात उपस्थित राहण्यास सांगितले आहे. अशी माहिती इंद्रपाल सिंग यांनी दिली आहे. ( Anil deshmukh third summons not received yet says advocate indrapal singh)

ईडीने यापूर्वी देशमुखांना दोन समन्स बजावले आहेत. त्याला त्यांनी आपल्या वकीलामार्फत ईडीला उत्तर दिले आहे. ईडीला सहकार्य करणार असल्याचे त्यांनी टि्वट केले होते. अनिल देशमुख यांनी त्यांच्या विरोधात सीबीआयने दाखल केलेला गुन्हा रद्द करावा, या मागणीसाठी याचिका केली होती.

Anil Deshmukh
BMC भविष्यात आंतरराष्ट्रीय बोर्डाच्या शाळा सुरु करणार - आदित्य ठाकरे

देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पलांडे व स्वीय सहाय्यक कुंदन शिंदे या दोघांना ईडी विशेष न्यायालयाने येत्या 6 जुलैपर्यंत कोठडी सुनावली आहे. आयपीएस अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या आणि विशेषकरून बदल्यांमध्ये माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची भूमिका होती, असे त्यांचा संजीव पलांडे याने सक्तवसुली संचलनालयाला (ईडी) दिलेल्या जबाबात सांगितल्याचा दावा ‘ईडी’ने केला आहे. अनिल देशमुख यांच्या नागपूर व वरळी येथील घराची ईडीने झाडाझडती घेतली होती.

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंह यांनी केलेल्या आरोपानंतर अनिल देशमुख यांना गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर देशमुख यांच्यावर ईडीने गुन्हा दाखल केला होता परमबीरसिंह यांनी लिहिलेल्या आठ पानी पत्रांत गृहमंत्र्यांनी वाझेला बोलावून कसे हफ्ते गोळा करायला सांगितले, हे सविस्तर लिहिले होते. याबाबत झालेल्या बैठकांना गृहमंत्र्यांचे खासगी सचिव संजीव पलांडे हे पण उपस्थित होते, असा उल्लेख परमबीरसिंह यांनी होता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com