esakal | कोयना एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड | Mumbai
sakal

बोलून बातमी शोधा

mumbai

कोयना एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मध्य रेल्वेवरील कोल्हापूर-मुंबई कोयना एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये सोमवारी, (ता.11) रोजी बिघाड झाला. त्यामुळे ही गाडी लोणावळा येथे थांबली. त्यानंतर कोयना एक्स्प्रेसला दुसरे इंजिन जोडून एक्स्प्रेसचा प्रवास पूर्वरत करण्यात आला, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाच्यावतीने देण्यात आली.

सोमवारी, (ता.11) रोजी सकाळी 11 च्या सुमारास कोल्हापूर-मुंबई कोयना एक्स्प्रेसच्या इंजिनात तांत्रिक बिघाड झाला. यावेळी ही एक्स्प्रेस लोणावळा स्थानकात होती. मध्य रेल्वेच्या अधिकाराऱ्यांना इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती मिळाली असता, त्यांनी तत्काळ सहाय्यक इंजिन कोयना एक्स्प्रेसला जोडले. त्यानंतर बिघाड झालेल्या इंजिनाला दुरूस्त करण्यात आले. त्यानंतर दुरूस्त केलेल्या इंजिनासह दुपारी 12 च्या सुमारास कोयना एक्स्प्रेस पुढच्या प्रवासासाठी रवाना झाली, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.

loading image
go to top