Lockdown : शिक्षकांचीही उपासमार, दोन महिन्यापासून मानधनाविना

teacher
teacher

कल्याण : कोरोना लॉकडाउनमुळे सर्वच शाळा बंद असल्याने अनुदानीत शासनमान्य शाळेतील सर्व शिक्षकांचे पगार सुरू असतांना राज्यातील विनाअनुदानित इंग्रजी तसेच मराठी माध्यमाच्या शाळांच्या शिक्षकांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. 

राज्यातील इंग्रजी माध्यमाच्या सीबीएससी, आयसीएसई, आयबी आणि स्टेट बोर्ड या शाळांच्या  संस्था चालकांनी आपली मनमानी सुरू केली असून राज्यातील बहुतांश शाळांनी मार्च, एप्रिलपासून शिक्षकांना पगार देणे बंद केलेला आहे. या शिक्षकांना संस्था स्तरावर मानधन स्वरूपात पगार दिला जातो. अनेक वर्षांपासून शिक्षक या शाळांमध्ये कार्यरत आहेत. पगार न झाल्यामुळे कल्याण डोंबिवलीसह राज्यातील लाखो शिक्षकांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. 

या शिक्षकांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध महाराष्ट्र राज्य क्रीडा संघर्ष समिती च्या वतीने अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र पवार सचिव अविनाश ओंबासे ,कार्याध्यक्ष गुलाबराव पी. पाटील, उपाध्यक्ष अनिल बोरनारे, प्रा.उदय नाईक यांनी मुख्यमंत्री व शिक्षणमंत्री यांना निवेदन देऊन शिक्षकांवर होणारा अन्याय दूर करण्यासाठी विनंती केली आहे .

न्याय देण्याची मागणी
लवकरात लवकर निर्णय घेऊन राज्यातील शिक्षकांना न्याय द्यावा. अशी विनंती केली आहे शिक्षकांना न्याय मिळाला नाही तर  समितीचे सर्व पदधिकारी लक्षम इंगळे, गुलाबराव पाटील, सुप्रिया नायकर, महादेव शिरसागर, कृष्णा माळी, विलास वाघ , अनिल शेजवळ, दशरथ आगवणे, गजानन वाघ, संतोष पाठक, विजय सिन्ह, सागर कावळे, आणि इतर सर्व सदस्य सोशियल डिस्टंसिंग चा वापर करून उपोषनाला बसण्याची तयारी करत आहेत. असे संघर्ष समितीचे अध्यक्ष नरेंद्र पवार यांनी सांगितले.

English medium school teacher without payment form two months, time of starvation

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com