esakal | 'हा' कांदा आलाय बाजारात; त्याचे आहेत औषधी गुणधर्म..
sakal

बोलून बातमी शोधा

'हा' कांदा आलाय बाजारात; त्याचे आहेत औषधी गुणधर्म..

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत नवीन कांद्याची आवक सुरू झाली असून, बाजारात सर्वत्र लाल चटक कांदे पाहायला मिळत आहेत; मात्र त्याचबरोबर पांढरा कांदाही ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहे.

'हा' कांदा आलाय बाजारात; त्याचे आहेत औषधी गुणधर्म..

sakal_logo
By
शरद वागदरे

नवी मुंबई ः मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत नवीन कांद्याची आवक सुरू झाली असून, बाजारात सर्वत्र लाल चटक कांदे पाहायला मिळत आहेत; मात्र त्याचबरोबर पांढरा कांदाही ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहे. या पांढऱ्या कांद्यात औषधी गुणधर्म असल्याने, मसाला बनवण्यासाठी गृहिणींकडून त्याला विशेष मागणी असते. त्यातच हा गोड लागतो. त्यामुळे या कांद्याला बाजारात चांगला उठाव मिळत आहे.
 
ही बातमी वाचली का? मुंबईत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना आझाद मैदानात हलविले

घाऊक कांदा-बटाटा बाजारात सध्या कांद्याच्या 100 ते 125 गाड्या दाखल होत आहेत. यामध्ये ओल्या कांद्याचे प्रमाण अधिक आहे. महाराष्ट्रातील नाशिक, नगर, पुण्याबरोबरच गुजरातचा कांदादेखील बाजारात येत आहे. तसेच नाशिक आणि गुजरातमधून पांढऱ्या कांद्याची आवक बाजारात होत आहे. दररोज चार ते पाच गाड्या दाखल होत असून, पांढऱ्या कांद्याला चांगला उठावही मिळत आहे.

ही बातमी वाचली का? पोलिसाच्या धाकाने सई ताम्हणकरने गायलं गाणं.. 

हा कांदा चवीला गोड लागत असल्याने, दररोजच्या जेवणासाठी नाही; मात्र, जेवणाबरोबर खाण्यासाठी किंवा औषधी उपयोग म्हणून त्याचा वापर केला जातो. त्यामुळे आवक कमी असली, तरी हा कांदा मागणीला पुरत आहे. आपल्याकडे नाशिक, अलिबाग, वसई या भागांत कांद्याचे उत्पादन घेतले जाते. मात्र, सध्या नाशिक आणि गुजरातमधून हा कांदा बाजारात येत आहे. अलिबागमधील कांदा घाऊक बाजारात येत नाही. तिथल्या स्थानिक बाजारातच तो विकला जातो. 

ही बातमी वाचली का? ..'यामुळे' ते धावतायेत रस्त्यांवर! जीवाला धोका..

सध्या लाल कांद्याला घाऊक बाजारात 30 ते 50 रुपये किलोचा दर मिळत आहे; तर नाशिक आणि गुजरातमधून नव्याने येत असलेला पांढरा कांदा 40 ते 50 रुपये किलो दराने विकला जात आहे. मात्र, बाजारात त्याला बऱ्यापैकी मागणी आहे. 
- सुरेश शेळके, व्यापारी.

loading image
go to top