पोलिसाच्या धाकाने सई ताम्हणकरने गायलं गाणं..

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 7 January 2020

बोल्ड अँड ब्युटीफुल सई ताम्हणकर.  अनेक तरुणांच्या  दिलाकी धडकन. तिच्या अदा (Sai Tamhankar) तिचं बोलणं,  बोल्ड अवतार यावर सगळेच जण फिदा असतात. तिने तिच्या अभिनयासोबत तिच्या आवाजाने देखील सगळ्यांना मदहोश केलं आहे. तिचं का जीव तोळा तोळा हे गाणं तर अजूनही प्रेक्षकांच्या ओठांवर रेंगाळते. 

सई घाबरली पोलिसाला

बोल्ड अँड ब्युटीफुल सई ताम्हणकर.  अनेक तरुणांच्या  दिलाकी धडकन. तिच्या अदा (Sai Tamhankar) तिचं बोलणं,  बोल्ड अवतार यावर सगळेच जण फिदा असतात. तिने तिच्या अभिनयासोबत तिच्या आवाजाने देखील सगळ्यांना मदहोश केलं आहे. तिचं का जीव तोळा तोळा हे गाणं तर अजूनही प्रेक्षकांच्या ओठांवर रेंगाळते. 

सई घाबरली पोलिसाला

पण सगळ्यांची लाडकी सई, चक्क एका पोलिसाला घाबरलेली पाहायला मिळाली. या पोलिसाने तिला चक्क गाणे गाण्यास सांगितले. तिने सुद्धा 'शिट्टी वाजली' हे गाणे आपल्या आवाजात सगळ्यांसमोर सादर केले. हा सगळा प्रकार घडलाय 'महाराष्ट्राचा फेवरेट कोण २०१९' या सोहळ्यात!

मोठी बातमी 'त्या' जाहिरातीनंतर शिवप्रेमींकडून अक्षय कुमारची 'धुलाई'   

'झी टॉकीज' ही मराठी चित्रपट वाहिनी दरवर्षी 'महाराष्ट्राचा फेवरेट कोण?' हा सोहळा आयोजित करते. यंदाचे वर्ष सुद्धा याला अपवाद नव्हते. सई ताम्हणकरने गायलेले 'शिट्टी वाजली' हे गाणे सुद्धा यंदाच्या सोहळ्यातील मुख्य आकर्षण ठरले. अभिनेता सागर कारंडे याने पोलिसाच्या भूमिकेत स्टेजवर एंट्री घेतली. एवढेच नाही, तर सागरने थेट प्रेक्षकांमध्ये जाऊन त्याने सगळ्या उपस्थित कलाकारांना पोलिसी जरब दाखवली. सईने या पोलिसाचा धाक घेतल्याचं सगळ्यांनाच पाहायला मिळालं. अर्थात, तिने सादर केलेले गाणे हा सगळ्यांच्या मनोरंजनाचा मोठा विषय ठरला आहे.

मोठी बातमी - सांगली, कोल्हापूरनंतर आता हे शहर बुडणार!

अशाच अनेक मजेशीर गोष्टी वेगवेगळे किस्से पाहायचे असतील तर 'महाराष्ट्राचा फेवरेट कोण २०१९' नक्की पाहा. लवकरच हा टीव्हीवर प्रदर्शित करण्यात येणार आहे. 

WebTitle : sai tamhankar sings song in maharashtracha favorite kon awards


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sai tamhankar sings song in maharashtracha favorite kon awards