मुंबई-गोवा महामार्गावर एर्टिगा जळून खाक; जीवितहानी नाही

नरेश पवार
रविवार, 19 मे 2019

पेण (रायगड) : कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या एर्टीगा गाडी ( MH46 BA 5471) ने पेण नजीक हमरापूर फाटा येथील पुलावर अचानक पेट घेण्याची घटना शनिवारी पहाटे घडली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी घडली नाही.

पेण (रायगड) : कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या एर्टीगा गाडी ( MH46 BA 5471) ने पेण नजीक हमरापूर फाटा येथील पुलावर अचानक पेट घेण्याची घटना शनिवारी पहाटे घडली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी घडली नाही.

मुंबई, अंधेरी येथील शंकर जाधव ( वय 61) हे शनिवारी पहाटे आपल्या एर्टीगा गाडीने कोकणातून मुंबईकडे निघाले होते. पेण जवळील हमरापूर फाटा येथील उड्डाण पुलावर आली असता गाडीने अचानक पेट घेतला. जाधव हे प्रसंगांवधान राखून गाडीतून खाली उतरल्याने पुढील मोठा अनर्थ टळला. मात्र, गाडी त्यातील सामान पूर्णपणे जळून खाक झाले.

पेण नगरपालिकेच्या अग्निशमन दलाने तातडीने जाऊन आगीवर नियंत्रण मिळवले. याबाबत दादर सागरी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ertiga burn at Mumbai-Goa highway no casualties