उपनगरीय रुग्णालयांनाही  सतर्क राहण्याचे आदेश 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 मार्च 2020

दर वर्षी पावसाळ्यात विविध साथीच्या रोगांचा सामना पालिकेच्या आरोग्य खात्याला करावा लागतो. साथीचे रोग आटोक्‍यात आणण्यासाठी पालिकेच्या प्रत्येक उपनगरीय रुग्णालयात पावसाळी साथीच्या आजारासाठी प्रत्येक रुग्णालयात एक वॉर्ड सज्ज ठेवण्यात येतो. स्वाईन फ्लूचा प्रादुर्भाव वाढला तेव्हाही पालिकेने स्वाईन फ्लूच्या रुग्णांसाठी स्वतंत्र कक्ष तयार केला होता.

मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने पालिकेच्या 16 उपनगरीय रुग्णालयांनाही सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. पावसाळी साथीच्या रुग्णांचे वॉर्ड विलगीकरण कक्ष म्हणून निर्माण करण्यात येणार आहे. 

हे वाचा : अजूनही जिवंत आहे माणुसकी
 

दर वर्षी पावसाळ्यात विविध साथीच्या रोगांचा सामना पालिकेच्या आरोग्य खात्याला करावा लागतो. साथीचे रोग आटोक्‍यात आणण्यासाठी पालिकेच्या प्रत्येक उपनगरीय रुग्णालयात पावसाळी साथीच्या आजारासाठी प्रत्येक रुग्णालयात एक वॉर्ड सज्ज ठेवण्यात येतो. स्वाईन फ्लूचा प्रादुर्भाव वाढला तेव्हाही पालिकेने स्वाईन फ्लूच्या रुग्णांसाठी स्वतंत्र कक्ष तयार केला होता. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यास तो कक्ष विलगीकरण कक्ष केला जाणार आहे. आचारसंहिता लागू करूनही नागरिक घरी थाबत नाहीत. त्यामुळे कोरोनाचा फैलाव होण्याची शक्‍यता लक्षात घेऊन उपनगरीय रुग्णालयांना सज्ज राहण्याचे आदेश पालिकेच्या आरोग्य खात्याने दिले आहेत. 

हे वाचा : मुंबई - गोवा सीमा सील

डॉक्‍टरांचे प्रशिक्षण 
पालिकेच्या रुग्णालयासह खासगी रुग्णालयात कोरोना तपासणी सुविधा उपलब्ध करण्यापूर्वी तेथील डॉक्‍टरांना पालिकेकडून प्रशिक्षण देण्यात आले आहे. तपासणी आणि इतर प्रक्रियांबाबत माहिती देण्यात आली आहे. 

जोगेश्वरीच्या ट्रामामध्ये विलगीकरण कक्ष 
पालिकेच्या जोगेश्वरी येथील बाळासाहेब ठाकरे ट्रामा सेंटरमध्ये विलगीकरण कक्ष सुरू करण्यात आले आहे. तेथे कोरोनाची ओपीडी सुरू केली आहे. रुग्णांना ऍडमिट आणि तपासणी तसेच रिपोर्टही तेथेच उपलब्ध करून दिले जात आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Even to suburban hospitals Alert

फोटो गॅलरी