विधानसभा निवडणुकीत महायुतीने घवघवीत यश मिळवले. आगामी मुंबई पालिका निवडणूक बघता या वेळी मुंबईच्या वाट्याला अधिक मंत्रिपदे मिळतील, असा अंदाज राजकीय तज्ज्ञांकडून व्यक्त होत असताना,.मुंबईच्या वाट्याला केवळ दोन कॅबिनेट मंत्रिपदे आली आहेत. नवव्यांदा आमदार झालेल्या कालिदास कोळंबकर यांची मंत्रिपदाची संधी हुकली असून, शिवसेनेकडून मुंबईला प्रतिनिधित्व मिळाले नाही.विधानसभा निवडणुकीत मुंबईतील ३६ जागांपैकी महायुतीने २२ जागा जिंकत कमबॅक केले. यामध्ये भाजपने सर्वाधिक १५ जागा जिकल्या. त्यामुळे या वेळी मंत्रिमंडळात मुंबईला झुकते माप मिळेल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. प्रत्यक्षात मात्र मुंबईतून फक्त दोन जणांची मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे. आगामी निवडणुकीत मुंबई पालिका शिवसेनेच्या हातातून काढून घेण्याची तयारी भाजपने चालवली आहे. .या पार्श्वभूमीवर मंत्रिपदे वाढतील, असा कयास होता. मात्र गेल्या महायुती सरकारमध्ये मुंबईत मंगल प्रभात लोढा हे एकमेव मंत्री होते. त्या तुलनेत या वेळी भाजपने मुंबईला दोन मंत्रिपदे दिली आहेत. अणुशक्तीनगर मतदारसंघातून विजयी झालेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सना मलिक यांना राज्यमंत्रिपदाची संधी मिळणार असल्याचे बोलले जात होते; मात्र केवळ १० मंत्रिपदे मिळालेल्या राष्ट्रवादीकडून दोन मुस्लिम चेहरे देणे पक्षाला शक्य नव्हते. त्यामुळे सना मलिक यांचे मंत्रिपद हुकल्याचे सांगितले जाते. .मुंबईच्या वाट्याला कमी मंत्रिपदे आली असली तरी ही कसर म्हाडा, झोपू महामंडळ यासह महत्त्वाच्या महामंडळांवर मुंबईतील भाजप आमदारांची वर्णी लावून भरून काढली जाऊ शकते. ही महामंडळे मुंबईच्या दृष्टीने महत्त्वाची आहेत. दुसरीकडे विधानसभा अध्यक्षपदी यापूर्वीच कुलाब्याचे आमदार राहुल नार्वेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे मोठे पद मानले जाते. त्यामुळे प्रत्यक्षात तीन पदे मुंबईला मिळाल्याचा युक्तिवादही भाजप नेत्यांकडून केला जात आहे. .शिवसेनेकडून एकालाही संधी नाहीमुंबईत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने १६ जागा लढवल्या; मात्र पक्षाला केवळ ६ जागा जिंकता आल्या. गेल्या सरकारमध्ये शिवसेनेकडून मुंबईतील एकाही आमदाराला मंत्रिमंडळात संधी मिळाली नव्हती. सावंतवाडीचे आमदार असलेल्या दीपक केसरकर यांच्याकडे मुंबई शहराच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. या वेळी शिवसेनेने मुंबईतल्या सहापैकी एकाही आमदाराला मंत्रिमंडळात स्थान दिलेले नाही. त्यामुळे शिवसेना मुंबईत आपला विस्तार कसा करणार, यावर चर्चा सुरू आहे. शिवाय मुंबईत भाजप मोठा भाऊ असल्याचे पक्षाने मान्य करून टाकल्याचा राजकीय अर्थ यातून घेतला जात आहे. .यांची नावे होती चर्चेतसलग नवव्यांदा वडाळा मतदारसंघातून निवडून आलेल्या आमदार कालिदास कोळंबकर यांना संधी मिळण्याची शक्यता होती. तशी इच्छा त्यांनी जाहीरपणे बोलून दाखविली होती, मात्र त्यांना संधी मिळाली नाही. योगेश सागर, पराग आळवणी, अतुल भातखळकर आणि अमित साटम यांची नावेही मंत्रिपदाच्या चर्चेत होती; मात्र मंत्रिमंडळात यापैकी कुणालाही स्थान मिळाले नाही. .सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.