मनसेच्या अविनाश जाधवांना भाजपचा पाठिंबा, संधी सगळ्यांना मिळते म्हणत शिवसेनेला इशारा...

सुमित बागुल
Tuesday, 4 August 2020

ठाण्यातील मनसेच्या बड्या नेत्याला तडीपारीची नोटीस बजावून अटक देखील झाली. 

मुंबई : ठाण्यातील मनसेच्या बड्या नेत्याला तडीपारीची नोटीस बजावून अटक देखील झाली. मनसे नेते अविनाश जाधव यांच्या अटकेनंतर आणि त्यांना देण्यात आलेल्या तडीपारीच्या नोटिशीनंतर आता या प्रकरणात आता राजकारण तापताना पाहायला मिळतंय. कारण महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेते अविनाश जाधव यांना आता थेट भाजपातून पाठिंबा मिळतोय. 

नक्की प्रकरण आहे तरी काय ?

आधी जाणून घेऊयात नक्की हे प्रकरण आहे तरी काय?  महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेते अविनाश जाधव यांनी वसई विरार महापालिकेत आंदोलन केलं होतं. त्या प्रकरणी अविनाश जाधव यांना दोन वर्षांसाठी तडीपारीची नोटीस पाठवण्यात आली होती. यानंतर त्यांनी ठाणे महापालिकेसमोर परिचारिकांसाठी आंदोलन केलं होतं. या आंदोलनादरम्यान पोलिसांनी अविनाश जाधव याना ताब्यात घेतलं होतं. त्यांचा जामीनही नामंजूर केला गेलेला. 

मोठी बातमी - मुंबईच्या पूर्व उपनगरात पावसाचा तडाखा, अर्धे टिळकनगर पाण्याखाली...

नीलेश राणे यांनी सरकारवर डागली तोफ : 

याप्रकरणी आता माजी खासदार निलेश राणे यांनी सरकारवर तोफ डागली आहे. या प्रकरणात उडी घेत निलेश राणे म्हणालेत की, एकीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेते अविनाश जाधव यांना दोन वर्ष तडीपार केलं जातं. मात्र दुसरीकडे शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांचा मुलगा दारू पिऊन थेट पोलिसांना धमकावतो आणि त्या प्रकरणी साधी तक्रारही दाखल केली जात नाही. दरम्यान संधी सगळ्यांना मिळते. त्यामुळे  राज्य सरकारने ही बाब विसरू नये असंही निलेश राणे म्हणालेत. 

शिवसेना विरुद्ध महाराष्ट्र नवनिर्माण सेना 
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील सर्व नेते आणि स्वतः राज ठाकरे यांनी "मी अविनाश जाधव यांच्या सोबत आहे" असं म्हणून अविनाश जाधव याना धीर आणि पाठिंबा दिला आहे. शिवसेना मंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या विरोधात मुद्दाम कारवाई केल्याचा आरोप अविनाश जाधव यांनी केलाय. 

ex mp nilesh rane supports thane mns leader avinash jadhav


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ex mp nilesh rane supports thane mns leader avinash jadhav