मुंबईच्या पूर्व उपनगरात पावसाचा तडाखा, अर्धे टिळकनगर पाण्याखाली...

मिलिंद तांबे
Tuesday, 4 August 2020

रात्रभर बसणाऱ्या पावसाने पूर्व उपनगरांना झोडपून काढले

मुंबई - रात्रभर बसणाऱ्या पावसाने पूर्व उपनगरांना झोडपून काढले. कुर्ला, चेंबुरमध्ये काही घरातही पाणी शिरलंय. रेल्वे रुळावर पाणी आल्याने हार्बर सेवा ठप्प झालीये.  

मुंबईत रात्रभर  मुसळधार पाऊस कोसळला, तर सकाळपासून संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे या अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचले आहे. पूर्व उपनगरात चेंबूर, कुर्ला आणि  टिळकनगर या परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी भरले आहे. 

VIDEO रात्रीपासून कोसळणाऱ्या पावसामुळे पश्चिम एक्सप्रेस हायवेजवळ डोंगराचा भाग कोसळला, वाहतूक ठप्प 
 

कुर्ला, चेंबूर या भागात काही घरात पाणी शिरलंय. दमदार पावसानंतर अर्धे टिळकनगर पाण्याखाली असून, या भागात सर्वत्र दिड ते दोन फूट पाणी आहे. नेहरूनगर, चेंबूरच्या शेल कॉलनी आणि पोस्टल कॉलनीत पाणी साचल्याने नागरिकांना पाण्यातून मार्ग काढत चालावं लागतय. 

रुळावर पाणी साचल्यामुळे हार्बर मार्गावरची अत्यावश्यक लोकलची वाहतूक ठप्प झाली आहे. चेंबूर ते टिळकनगर आणि टिळकनगर ते कुर्ला तसच चूनाभट्टी या स्थानकादरम्यान रुळावर पाणी साचले आहे. पावसाचा जोर काहीसा कमी झाला असून आता काही ठिकाणी पाणी निचरायला सुरुवात झाली आहे.

( संकलन - सुमित बागुल ) 

heavy rainfall slams eastern suburbs of mumbai half tilaknagar is in water 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: heavy rainfall slams eastern suburbs of mumbai half tilaknagar is in water