मुंबईचे माजी पोलीस आयुक्त अन् अर्णब गोस्वामींमध्ये 'सेटलमेंट'; परमबीर सिंह भरणार दंड! : Parambir Singh | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Arnab Goswami_Parambir Singh

Parambir Singh: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त अन् अर्णब गोस्वामींमध्ये 'सेटलमेंट'; परमबीर सिंह भरणार दंड!

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी वरीष्ठ पत्रकार अर्णब गोस्वामी आणि ARG आउटलिअर यांच्याविरोधातील ९० लाख रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा मागे घेतला आहे. पण यामुळं कोर्टानं सिंह यांनाच १,५०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. (Ex Mumbai CP Param Bir Singh Withdraws Defamation Suit Against Arnab Goswami)

गेल्या वर्षी हा खटला दाखल करण्यात आला होता. अर्णब गोस्वामींनी आपली प्रतिमा मलिन केल्याचं सांगत परमबीर सिंह यांनी गोस्वामींविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करत त्यांनी वार्षिक 12 टक्के व्याजासह 90 लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याची मागणी केली होती.

हेही वाचा: Chandrakant Patil: चंद्रकांत पाटलांवर शाई फेकणाऱ्या मनोज गरबडेसह तिघांना जामीन मंजूर

परमबीर सिंह यांनी बिनशर्त खटला मागे घेण्यासाठी बुधवारी स्थानिक कोर्टात अर्ज दाखल केला होता. यावर अर्णबचे वकील अॅड. प्रदीप गांधी यांनी हरकत घेतली नाही. उलट खटला दाखल करताना गोस्वामी यांना झालेल्या त्रासाची नुकसानभरपाई मागितली. यानंतर कोर्टानं म्हटलं की, "दावा दाखल केल्यामुळं प्रतिवादीला वकील नेमावा लागला. त्यामुळं मला वाटतं खटला बिनशर्त मागे घेण्यासाठी याचिकाकर्त्याला खर्च द्यावा लागेल. यानंतर न्यायाधीशांनी वकिलांचं म्हणणं नोंदवत आणि परमबीर यांना याचिका मागे घेण्यास परवानगी दिली.

हे ही वाचा : संयुक्त नावावरील गृहकर्जातून होईल प्राप्तीकराची बचत...

दरम्यान, 24 मार्च 2021 रोजी मुंबई हायकोर्टात गोस्वामींनी पोलिसांविरुद्ध, विशेषत: तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याविरुद्ध 'गंभीर गैरप्रकार' केल्याचा आरोप केला होता. यानंतर कोर्टानं गोस्वामी यांना अटकेपासून मर्यादित संरक्षण दिले.

टॅग्स :Mumbai Newsarnab goswami