esakal | ती करत होती कोरोनासाठीच्या औषधांचं ब्लॅक मार्केटिंग, पोलिसांना समजलं आणि गेम ओव्हर...
sakal

बोलून बातमी शोधा

ती करत होती कोरोनासाठीच्या औषधांचं ब्लॅक मार्केटिंग, पोलिसांना समजलं आणि गेम ओव्हर...

उल्हासनगरात कोरोनाचे इंजेक्शन ब्लॅकने विकणारी सेवानिवृत्त शिक्षिका गजाआड

ती करत होती कोरोनासाठीच्या औषधांचं ब्लॅक मार्केटिंग, पोलिसांना समजलं आणि गेम ओव्हर...

sakal_logo
By
दिनेश गोगी

उल्हासनगर : कोरोनाचा रुग्ण हा क्रिटिकल अवस्थेत आल्यावर त्याला देण्यात येणारे टोलसीझुबम हे महागडे इंजेक्शन ब्लॅकमध्ये विकणाऱ्या  उल्हासनगरातील एका सेवानिवृत्त शिक्षिकेला फूड अँड ड्रग्ज शाखेने सापळा रचून गजाआड केले आहे. यामागे मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता सहआयुक्त (दक्षता) सुनील भारद्वाज यांनी वर्तवली आहे.

मोठी बातमी - लॉकडाऊन काळात खाण्याचे ट्रेंड बदलले; 'या' पदार्थांची मागणी घटली, तर 'यांची' वाढली..

काल रात्री उल्हासनगरात उच्चभ्रू वसाहत मनिष नगरमध्ये राहणारी नीता पंजवानी ही महिला कोरोनवरील सिप्ला कंपनीचे ऍक्टरमा-400 हे 40 हजार 545 रुपयांना मिळणारे इंजेक्शन 60 हजार रुपयांना विकत असल्याची माहिती फूड अँड ड्रग्ज खात्याला मिळाली होती. त्यानुसार अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त अरुण उन्हाळे आणि त्यांच्या टीमने नीता पंजवानी यांच्याकडे बनावट ग्राहक पाठवले. टोलसीझुमब ऍक्टरमा-400 हे इंजेक्शन 60 हजार रुपयात देताना नीता हिला अटक करण्यात आले.

मोठी बातमी - मुंबईतील जमिनीखालचा 'महाकाय मॉन्स्टर' आला जमिनीवर, तब्बल पाच तास रस्त्यावरून प्रवास...

अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, राजेंद्र यड्रावकर यांच्या आदेशानुसार अशी कोरोनावरील इंजेक्शने विकणाऱ्या टोळींना अटक करण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. हे इंजेक्शन सिप्ला कंपनीचे असून त्याचा प्रचंड तुटवडा आहे. कोविड रुग्णालयातील डॉक्टरच्या तपशीला शिवाय ते मेडिकल मधून मिळत नाही. असं असतानाही या महिलेने हे इंजेक्शन कुठून आणले, यापूर्वी तिने किती इंजेक्शन्स विकली, तिच्यासोबत कोणकोण सक्रिय आहे याचा लवकरच पर्दाफाश करण्यात येणार अशी माहिती सुनील भारद्वाज यांनी दिली.

( संपादन - सुमित बागुल ) 

ex teacher was doing black marketing of expensive actemra 400 injection

loading image
go to top