अतिप्रदूषणामुळे मुंबईकरांमध्ये बाहेर जाण्याची ओढ वाढली: मुंबईबाहेरील शुद्ध हवा घेण्याचा 15 ते 20 टक्के नागरिकांचा निर्णय

अतिप्रदूषणामुळे मुंबईकरांमध्ये बाहेर जाण्याची ओढ वाढली: मुंबईबाहेरील शुद्ध हवा घेण्याचा 15 ते 20 टक्के नागरिकांचा निर्णय



मुंबई  : सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे मुंबईकरांनी मुंबईतून बाहेर जाण्याचा मार्ग निवडला आहे. मुंबईत वाढलेल्या वायू प्रदूषणाचा सध्या सर्वांनाच त्रास होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर जवळपास 15 ते 20 टक्के मुंबईकर आपल्या कुटुंबियांसोबत मुंबईबाहेर गेले आहेत. अपेक्स ग्रुप ऑफ रुग्णालय समुहाने याबाबतचे निरीक्षण केले असून त्यातून ही बाब समोर आली आहे. 

मुंबईत बोरिवलीच्या अपेक्स ग्रुप ऑफ रुग्णालयाच्या समूहाने केलेल्या एका निरिक्षणात मुंबईत रात्री 11 ते सकाळी 5 वाजेपर्यंत असलेल्या संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर तसेच वाढत असलेल्या वायू आणि ध्वनी प्रदूषणाला कंटाळून अनेक मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यातील नागरिक पुढचे किमान 8 दिवस तरी शुद्ध आणि प्रसन्न वातावरणाच्या सानिध्यात जाणार असल्याचे दिसून आले आहे.

भारतात 17 लाख नागरिकांचा वायू प्रदूषणासंबंधित आजारांमुळे मृत्यू 

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर), 2019 च्या आकडेवारी नुसार, भारतामध्ये 17 लाख नागरिकांचा वायू प्रदूषणासंबंधित आजारांमुळे मृत्यू झाला असून हे प्रमाण एकूण मृत्यूच्या 18 टक्के इतके आहे. या आकस्मित मृत्यूमुळे आपल्या राष्ट्राच्या जीडीपी मध्ये 2.6 लाख करोडचे ( 1.4 टक्के ) नुकसान झाले आहे. दिल्ली पाठोपाठ पुणे मुंबई, नवी मुंबई, ठाणे शहरात वायू प्रदूषण वाढत असल्याने मोठी चिंता व्यक्त होत आहे. या प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. नाताळाची सुट्टी लागल्यानंतर काहींना नववर्षापर्यंत सुट्टी आहे. मुंबई, नवी मुंबई व ठाण्यातील अनेक नागरिक आपल्या गावच्या ठिकाणी तसेच शुद्ध हवेच्या शोधात निघाल्याचे सर्वेक्षणात दिसून आले आहे. 
अपेक्स रुग्णालय समूहाचे छातिरोग -फुफ्फुसविकारतज्ञ डॉ. जिग्नेश पटेल यांनी सांगितले की, मुंबईत वाढणारे वायू प्रदूषण ही येणाऱ्या काळातील एक गंभीर समस्या असणार आहे. सध्या मुंबईत मेट्रोची कामे, थंडीमुळे आलेले धुके व या धुक्यामध्ये वाहनातील धूर मिसळल्यामुळे धुरके तयार होत आहे. परिणामी 'सीओपीडी'सारखा आजार होण्याची शक्यता वाढते. गेल्या महिन्याभरात आमच्याकडे आलेल्या अनेक रुग्णांनी या महिन्याच्या अखेरीस मुंबईच्या बाहेर जात असल्याचे सांगितले असून यामध्ये विशेषतः दम्याचे आजार आणि श्वसनविकार असलेल्या नागरिकांचा सहभाग होता. दरवर्षी हिवाळ्यामध्ये मुंबई व लगतच्या शहरातील 15 ते  20 टक्के नागरिक कमी प्रदूषित असलेल्या शहरात जातात आणि यावर्षीही हे प्रमाण तितकेच आहे." 

कर्करोगाची वाढती भीती - 
'' वाढत्या प्रदूषणामुळे कर्करोगासह अन्य आजारांनादेखील निमंत्रण मिळत आहे. सल्फर डायऑक्साइड, कार्बन मोनोक्साइडच्या संसर्गामुळे गुणसूत्रातील बदल होऊन कर्करोग होण्याची भीती निर्माण होऊ शकते. चोवीस तास धूर ओकणारे कारखाने आणि रस्त्यांवरील वाहनांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढत चालली आहे. या बाबतीत सरकारसह आपणही जबाबदारीने वागले पाहिजे. " 
डॉ. प्रवीण भुजबळ,
जेष्ठ फिजिशियनव व छातिरोगतज्ञ, स्टारसिटी मल्टीस्पेशालिटी रुग्णालय

Excessive pollution has made Mumbaikars more inclined to go out 15 to 20 per cent citizens decide to get fresh air outside Mumbai

--------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com