बनावट स्कॉच विक्रेत्यांवर अबकारी विभागाची कारवाई, 22 लाखांचा मुद्देमाल जप्त

प्रशांत कांबळे
Friday, 25 December 2020

 बनावट स्कॉच वाहून नेत असल्याच्या माहितीवरून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी कारवाई केली.

मुंबई:  बनावट स्कॉच वाहून नेत असल्याच्या माहितीवरून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी कारवाई केली. घाटकोपर ते मानखुर्द परिसरात होंडा सिटी वाहनातून स्कॉच वाहून नेत असल्याची माहिती अधिकाऱ्यांना मिळाली होती. दरम्यान कारवाईतील आरोपींकडून तपासादरम्यान घेतलेल्या माहितीवरून पनवेल परिसरात बनावट स्कॉच विक्री करणाऱ्या गोडाऊनवर धाड टाकण्यात आली. ज्यामध्ये 22 लाख 57 हजार 360 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती निरिक्षक विनय शिर्के यांनी दिली आहे.

घाटकोपर-मानखुर्द लिंक रोड, अग्निशमन केंद्राच्या परिसरात आरोपी महेंद्र नागेश्वर यादव (वय ४५) आपल्या होंडा सिटी वाहनामध्ये बनावट स्कॉचच्या बाटल्या घेऊन जात असल्याची माहिती मुंबई उपनगराच्या पथकाला लागली. त्यावरून त्याला मानखुर्द परिसरात अटक करण्यात आली. दरम्यान आरोपी यादवने दिलेल्या माहितीच्या आधारे अधिक तपास करण्यात आला. या तपासादरम्यान पनवेल येथील नांदगाव, पळस्पे फाटा परिसरात कच्च्या गोडाऊनमध्ये या बनावट स्कॉच बनवल्या जात असल्याचे आढळून आले. यामध्ये बनावट स्कॉच मद्य, बुचे, लेबल्स, फुड कलर, अन्य साहित्य दोन चारचाकी गाड्या आणि एक दुचाकी वाहन असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

याप्रकरणात विजू तिय्या आणि बिजू माधव या दोघांना अटक करण्यात आली आहे. तर इतर दोन अज्ञात आरोपी फरार असून अटक केलेल्या तीन आरोपींना न्यायालयासमोर हजर केल्यानंतर पाच दिवसाची कोठडी सुनावण्यात आली आहे. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतीलाल उमाप, अधिक्षक स्नेहलता श्रीकर यांच्या मार्गदर्शनात निरीक्षक विनस शिर्के, सुनिल आरडेकर, ज्योत्स्ना पाटील, मिसळे, भदरगे यांनी केली आहे. 

बनावट स्कॉचची विक्री उच्चभ्रू वस्तीत

भारतीय बनावटीचे कमी प्रतीचे मद्य विदेशी मद्याच्या (स्कॉचच्या) वेगवेगळ्या बॅण्डच्या रिकाम्या बाटल्यांमध्ये भरून त्यावर बनावट बुचाच्या साह्याने सिलबंद केले जाते आणि उच्चभ्रू वस्तीतील नागरिकांना डयुटी फ्री शॉपचे मद्य असल्याने सांगून अधिकृत दुकानांच्या किंमतीपेक्षा कमी किंमतीत विक्री केली जाते.

हेही वाचाकंगनाच्या घरावरील कारवाईवर पालिका ६ आठवड्यानंतर घेणार निर्ण

-------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Excise department action fake Scotch sellers seizes Rs 22 lakh liquor


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Excise department action fake Scotch sellers seizes Rs 22 lakh liquor