Sakal Impact: पालघर प्रकरणावर उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्तांचे चौकशीचे आदेश

Sakal-Impact
Sakal-Impactsakal

मुंबई : पालघर (palghar) येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या (excise department) कार्यालयामध्ये खासगी कंपनीच्या (private compony) कर्मचाऱ्यांकडूनच सॅनिटायझर उत्पादनाच्या (sanitizer production) बॅचचे सॅम्पल सिल (sample sealed) करण्याचे काम करून घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसा व्हिडीओ सुद्धा काढण्यात आला असून, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात सुरू असलेल्या अनागोंदी कारभाराची बातमी सकाळने प्रसिद्ध (sakal news) केल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतीलाल उमाप (kantilal umap) यांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहे.

Sakal-Impact
झुरळाची जाहीरात कंपनीच्या अंगलट; मागितली महिलांची माफी

आॅल फुड अँड ड्रग्स लायसन्स होल्डर फाऊंडेशनचे अध्यक्ष अभय पांडे आणि त्यांच्या सहकार्यांनी हा व्हिडीओ काढला असून, यामध्ये गैरकायदेशीपणे सॅनिटायझरच्या सॅम्पलचे सिल करण्याचे काम केल्या जात असल्याचा आरोप केला आहे. शिवाय सॅनिटायझरच्या उत्पादनाच्या वेळीच कंपनीकडून उत्पादन शुल्क विभागाला बॅच काढत असल्याचे कळवल्या जात असते. त्यानंतर तात्काळ त्याचे सॅम्पल तपासण्यासाठी पाठवायचे असते. त्यामूळे व्हिडीओमध्ये दिसणारे सुमारे 25 युनीट सॅम्पल एकाचवेळी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे कुठून आले असाही प्रश्न पांडे यांनी उपस्थित केला आहे.

मात्र, पालघर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक भुकन यांनी पांडेंचे आरोप खोटे असल्याचे सांगितले आहे. सॅनिटायझर बनवणाऱ्या एका खासगी कंपनीच्या प्रत्येक बॅच मधुन चार सॅम्पल काढले जाते. एफडीएने उत्पादनासाठी दिलेल्या परवानगी मध्ये अल्कोहोलचे प्रमाण असते. त्यामूळे अशा उत्पादनाचे सॅम्पल तपासणीसाठी पाठवल्या जात असते. पालघर मध्ये रिक्त पद असल्याने एका कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून एका बाॅक्समध्ये असलेले सॅम्पल फक्त टेबलावर काढून घेण्यात आले आहे. तर सील करण्याची एक पद्धत असून, लाखेच्या सहाय्याने पितळीच्या ठोक्याने मोहरबंद करून या सॅम्पलला अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सील केल्या जाते. त्यामूळे पाडे यांनी विनाकारण व्हिडीओ काढून त्रास देत असल्याचा आरोपही पालघर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक विठ्ठल भुकन यांनी पांडे यांच्यावर केला आहे.

Sakal-Impact
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकेत; १२ वर्षांखालील चार मुलांचा समावेश

व्हिडीओमधील चित्रण काय आहे?

पालघर येथील उत्पादन शुल्क कार्यालयातील आक्षेपार्ह कामकाजाचा काढण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये खासगी कंपनीचे कर्मचारी, उत्पादनाच्या बॅच प्रमाणे प्रत्येकी चार डब्यांचे युनिट तयार करून सुमारे 25 पेक्षा जास्त युनिट टेबलावर ठेवतांना दिसून येत आहे. यामध्ये त्याच कर्मचाऱ्यांनी टेबलाच्या आडून त्या बाटल्यांना एकत्र युनिट बनवण्याचे काम केले असून, काम पुर्ण झाल्यानंतर काही वस्तु बॅग मध्ये भरून ते कर्मचारी निघून जातांना दिसून येत आहे.

आयुक्तांच्या आदेशानंतर पालघर उत्पादन शुल्क विभागाचे डिवायएसपी शेख यांच्याकडे याप्रकरणाची चौकशी देण्यात आली आहे. यामध्ये गुरूवारी दिवसभर संबंधीत प्रकरणाची चौकशी करून, त्यासोबतच संबंधीत कंपनी आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांचेही बयान नोंदवून एकाच दिवसात आयुक्त कार्यालयाला यासंबंधीत अहवाल पाठवण्यात येणार आहे.

"सकाळ ने केलेल्या बातमीनंतर घटनेची सत्यता तपासण्यासाठी पालघरचे उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक भुकन यांना चौकशीचे आदेश दिले असून, त्यासंबंधीत अहवाल मागविण्यात आला आहे."

- कांतीलाल उमाप, आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क विभाग

"पालघर राज्य उत्पादन शुल्क विभागाने सॅनिटायझर उत्पादन करणाऱ्या कंपनीकडून गोळा करण्यात आलेले सॅम्पल कोणत्या कारणासाठी मागितले, यासंदर्भात एफडीएच्या कार्यालयाला कोणत्याही सुचना नाही. तर सॅम्पलसाठी एवढ्या युनिटची गरज नसते. त्यामुळे उत्पादन शुल्कच्या कारवाई संदर्भात काही बोलता येणार नाही."

- मनिष चौधरी, औषधी निरिक्षक, अन्न व औषध प्रशासन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com