सनराईज रुग्णालयातील 'ते' दोन मृत्यू आगीमुळे नाहीतर...

सनराईज रुग्णालयातील 'ते' दोन मृत्यू आगीमुळे नाहीतर...

मुंबई: भांडूप येथील ड्रीम मॉलमधील सनराईज रुग्णालयाला भीषण आग लागली आहे. रात्री 12 वाजताच्या दरम्यान भीषण आग लागल्याची माहिती मिळतेय. आताच आलेल्या माहितीनुसार, या आगीत 9 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. हे सर्व कोविड रुग्ण होते.  हे मृतदेह जवळील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. दरम्यान आग लागली तेव्हा सुरुवातीला या भीषण आगीत दोन जणांचा मृत्यू झाला होता. मृत्यू झालेले हे कोविड रुग्ण होते. सनराईज रुग्णालयाच्या म्हणण्यानुसार, जे दोन रुग्ण दगावले ते आगीमुळे दगावले नाही. त्यांचा मृत्यू आगीमुळे झालेला नाही, आधीच कोविड उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. त्यांच्या फॉर्मलिटीजचे काम बाकी होते. त्यामुळे शव रुग्णालयात होते, असं स्पष्टीकरण सनराईज रुगालयानं दिलं आहे. 

ड्रीम मॉलला मध्यरात्री 12 वाजता आग लागली. सुरुवातीला पहिल्या मजल्यावर लागलेली आग वाढत गेली. तिसऱ्या मजल्यावर कोविड रुग्णालय सनराईजपर्यत ही आग वाढत गेली. 76 लोक या रुग्णालयात उपचार घेत होते. 

आग लागली तेव्हा अलार्म वाजल्यानंतर ताबडतोब सर्व लाइट्स कनेक्शन बंद केले आणि रुग्णांना बाहेर काढले 76 च्या आसपास रुग्ण आतमध्ये होते. त्यात 2 जणांचा आधीच मृत्यू झाला होता. आता त्यांना जवळच्या मुलुंड जम्बो कोविड सेंटर आणि फोर्टिस रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनानं दिली आहे. 

नेमकं घडलं काय?

भांडूप पश्चिमला एक प्रसिद्ध ड्रीम मॉल आहे. या मॉलमध्ये रात्री १२ च्या सुमारास भीषण आग लागली. या मॉलमध्ये सनराईज रुग्णालय आहे. सध्या या रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार केले जात आहेत. सुरुवातीला ही आग मॉलच्या पहिल्या मजल्यावर लागली. त्यानंतर हळूहळू आगीनं रौद्ररुप धारण केलं आणि आग मॉलमधील रुग्णालयात पसरत गेली. ७६ रुग्णांवर या रुगालयात उपचार सुरु होते.

Explanation of Sunrise hospital Bhandup Fire 2 patients died

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com