वाशी - येथील पोलीस ठाण्याच्या आवारात बुधवार (ता. ०८) रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास अचानक स्फोट झाल्यासारखा मोठा आवाज होऊन पोलीस ठाण्यातील बाथरुमसह इतर ठिकाणी लावण्यात आलेले काच फुटले. तसेच परिसरातील काही घरांच्या भितींना तडे गेले असुन, घरावरील पञेही उडाले असुन परिसरातील काही दुकानातील काचाही फुटलेल्या आहेत. माञ हा स्फोट कशाचा झाला हे स्पष्ट झालेले नाही. सुदैवाने या घटनेत कुठलीही जिवितहानी झालेली नाही.