'एसटी व बेस्ट पासला मुदतवाढ द्या'; भाजप पदाधिकाऱ्याची परिवहनमंत्र्यांकडे मागणी

सकाळ वृत्तसेवा 
Thursday, 23 April 2020

लॉकडाऊनच्या काळात सामान्य प्रवाशांना बेस्ट व एसटीमधून प्रवास करण्यास बंदी आहे. त्यामुळे या काळासाठी दिलेल्या पासची मुदत वाढवावी किंवा त्याचे पैसे परत द्यावेत, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या उत्तर मुंबई शाखेचे उपाध्यक्ष महेश भट्ट यांनी केली आहे. 

मुंबई :  लॉकडाऊनच्या काळात सामान्य प्रवाशांना बेस्ट व एसटीमधून प्रवास करण्यास बंदी आहे. त्यामुळे या काळासाठी दिलेल्या पासची मुदत वाढवावी किंवा त्याचे पैसे परत द्यावेत, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या उत्तर मुंबई शाखेचे उपाध्यक्ष महेश भट्ट यांनी केली आहे. 

मुंबईतील महत्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

लॉकडाऊनच्या काळात काही बेस्ट व एसटी बससेवा सुरु होत्या; मात्र त्या फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठीच होत्या. सामान्य प्रवाशांना त्यातून प्रवास नाकारला गेला. बेस्ट तसेच एसटीचे हजारो प्रवासी नेहमीच वेगवेगळ्या कालावधीचा पास काढून त्यामार्फत प्रवास करतात. आता लॉकडाऊनच्या किमान दोन महिन्यांच्या काळात त्यांना प्रवास नाकारल्याने आधीच पास काढलेल्या प्रवाशांचे आर्थिक नुकसान होणार आहे. केंद्र सरकारने रद्द केलेल्या रेल्वेगाड्या आणि विमाने यांच्या तिकिटांचे पैसे प्रवाशांना परत दिले आहेत.

अधिक आणि सविस्तर बातम्या वाचण्यासाठी ईपेपर वाचा

त्याच धर्तीवर लॉकडाऊनच्या काळातील एसटी व बेस्ट पासचे पैसे परत द्यावेत किंवा यापुढील पास काढताना लॉकडाऊनच्या काळाएवढी विनाशुल्क मुदतवाढ प्रवाशांना द्यावी, अशी मागणी भट्ट यांनी केली आहे. परिवहन मंत्री अनिल परब व बेस्टचे महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे यांना यासंदर्भात त्यांनी पत्र लिहिले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Extend ST and Best Pass says mahesh bhat to state gov