esakal | न्यूड फोटो लीक करण्याची धमकी देऊन पतीचं ब्लॅकमेलिंग, दादरमधील घटना
sakal

बोलून बातमी शोधा

न्यूड फोटो लीक करण्याची धमकी, दादरमधील ब्लॅकमेलिंगची घटना

न्यूड फोटो लीक करण्याची धमकी, दादरमधील ब्लॅकमेलिंगची घटना

sakal_logo
By
दीनानाथ परब

मुंबई: दादर स्थित एका व्यावसायिकाकडून पैसे उकळल्या प्रकरणी (extorting money) मुंबई पोलिसांनी एका आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. बिझनेसमनला त्याच्या पत्नीचे न्यूड फोटो सोशल मीडियावर (social media) लीक करण्याची धमकी देऊन आरोपी पैसे उकळत होता. संतोष कुमार सिंह ऊर्फ बबूल ठाकूरने (४३) तक्रारदाराकडे (complainant) २० लाख रुपयांची मागणी केली होती. त्यासाठी तक्रारदार स्वत:चे घर विकण्याचाही विचार करत होता. तक्रारदाराने आरोपीला दीड लाख रुपये दिले होते. नंतर त्याने हा प्रकार आपल्या मित्राच्या कानावर घातला. त्याच्या सल्ल्यावरुन त्याने पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. (extorting money from Dadar based businessman on the pretext of leaking his wifes photographs)

३७ वर्षीय तक्रारदार जूनच्या पहिल्या आठवड्यात पोलिसांकडे गेला. "संतोष कुमार सिंह माझ्या घरी यायचा. त्याने माझ्या पत्नीबरोबर मैत्री केली. त्यांच्यामध्ये अनैतिक संबंधही होते" असे तक्रारदाराने तक्रारीत म्हटले आहे. तक्रारदाराला एप्रिल महिन्यात त्याची पत्नी आणि आरोपींमध्ये असलेल्या संबंधांबद्दल समजलं. संतोष कुमार सिंहने स्वत:हून त्याला पत्नीचे न्यूड फोटो दाखवले.

हेही वाचा: मुंबईसह कोकण किनारपट्टीसाठी पुढचे पाच दिवस मुसळधार पावसाचे

"त्यानंतर आपली बदनामी होईल. दोन मुलांवर परिणाम होईल या भीतीने तक्रारदार घाबरला. त्याने आरोपीने मागितलेली रक्कम देण्याचा निर्णय घेतला" असं अधिकाऱ्याने सांगितलं. "त्याच्याकडे २० लाख रुपये नव्हते. त्याने दीडलाख रुपये दिले, उर्वरित रक्कम लवकरच देण्याचे आश्वासनही दिले" असे अधिकाऱ्याने सांगितले. आता पोलीस या प्रकरणात चौकशी करत आहेत.