esakal | मुंबईसह कोकण किनारपट्टीसाठी पुढचे पाच दिवस मुसळधार पावसाचे
sakal

बोलून बातमी शोधा

rain

मुंबईसह कोकण किनारपट्टीसाठी पुढचे पाच दिवस मुसळधार पावसाचे

sakal_logo
By
दीनानाथ परब

मुंबई: मागच्या दोन दिवसांपासून मुंबईसह कोकण किनारपट्टी भागात मुसळधार पाऊस (heavy rain fall) कोसळत आहे. बुधवारी मुंबईत झालेल्या पावसाने पालिकेच्या दाव्यांची पोल-खोल केली. अनेक सखल भागात पाणी साचले होते. रेल्वे रुळावर पाणी आल्याने लोकल सेवेसह मुंबईच्या वेगाला ब्रेक लागला होता. (next five days heavy railfall possible in mumbai & kokan region)

आता पुढचे पाच दिवस मुंबईसह कोकण किनारपट्टी भागात मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मुंबई ठाण्यासह कोकणात मुसळधार पाऊस कोसळू शकतो, सर्वांनी हवामाना विभागाच्या या अंदाजाला गांभीर्याने घ्यावे, असे भारतीय हवामान विभागाचे के.एस.होसाळीकर यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे.

हेही वाचा: तब्बल तीन तास शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्यामध्ये चर्चा

मान्सून हळूहळू महाराष्ट्र व्याप्त चालला आहे. १३ जूनला मुंबई, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यासाठी रेड अलर्टचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. अत्यंत मुसळधार वृष्टी होण्याचा इशारा रेड अलर्टमध्ये देण्यात आला आहे.