मुंबईत डोळ्यांच्या आजाराची साथ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

eye disease

मुंबईत डोळ्यांच्या साथीच्या संसर्ग आढळून आला आहे.  विशेष म्हणजे लहान मुलांना हा संसर्ग मोठ्या प्रमाणात होत असून झपाटय़ाने वाढतही आहे.

मुंबईत डोळ्यांच्या आजाराची साथ

मुंबई - मुंबईत डोळ्यांच्या साथीच्या संसर्ग आढळून आला आहे.  विशेष म्हणजे लहान मुलांना हा संसर्ग मोठ्या प्रमाणात होत असून झपाटय़ाने वाढतही आहे. मुंबई महापालिकेच्या माध्यामातून अद्यापही कोणताही अलर्ट देण्यात आलेला नसला तरीही नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन पालिकेने केले आहे.

डोळ्यांची साथ ही स्पर्शाने पसरणारी नसली तरीही ही संसर्गजन्य आहे. त्यामुळे स्वच्छता आणि आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन पालिकेने केले आहे. डोळ्याच्या साथीशी संबंधित कोणतीही लक्षणे असल्यास आपल्या नजीकच्या डॉक्टरांना ही बाब दाखवा. डोळ्यांची साथ ही काळजीच्या दृष्टीने महत्त्वाची आहे.  परंतु नागरिकांनी भीती वाटण्याचे कारण नसल्याचेही डॉ शशांक जोशी यांनी स्पष्ट केले आहे.