Mumbai : फेस मास्कने तोंडाला आणला २० लाखांचा फेस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

face mask

फेस मास्कने तोंडाला आणला २० लाखांचा फेस

डोंबिवली : मुंबईतील चांदिवली परिसरात राहणाऱ्या एका व्यावसायिकाला डोंबिवलीतील दोघा भामट्यांनी २० लाखांचा गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे. फेस मास्क विकत देण्याच्या बहाण्याने या भामट्यांनी त्यांच्याकडून रक्कम घेतली; मात्र ना फेस मास्क दिले ना पैसे. या फसवणूकप्रकरणी विष्णू नगर पोलिसांनी आदित्य पाठक (२९) व सुहास पाठक (६५) यांना अटक केली आहे.

डोंबिवली पश्चिमेत शास्त्रीनगर परिसरात राहणारे पाठक यांनी मुंबईतील व्यापारी ताहा सिद्दिकी यांच्याशी जून २०२० मध्ये मास्कविक्रीचा व्यवहार केला होता. फेस मास्क देण्याच्या बहाण्याने त्यांच्याकडून पाठक यांनी २० लाख रुपये घेतले. पैसे देऊनही मास्क न दिल्याने तसेच पैसे परत मागितल्यानंतर बंद खात्याचे धनादेश देत सिद्दिकी यांची फसवणूक केली. सिद्दिकी यांनी डोंबिवलीतील विष्णूनगर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी शुक्रवारी (ता. १९) गुन्हा दाखल करत दोघांना दुसऱ्या दिवशी अटक केली.

loading image
go to top