फेसबुकवर झाली त्यांची ओळख; तिने त्याला आकांत बुडवलं...

सकाळ वृत्तसेवा
Monday, 3 February 2020

फेसबुकवरून एका अनोळखी महिलेसोबत मैत्री करणे कामोठे, सेक्‍टर- १२ मधील एका व्यावसायिकाला महागात पडले आहे. या व्यावसायिकाने ज्या अनोळखी महिलेसोबत फेसबुकवरून मैत्री केली, त्या महिलेने परदेशातून एक कोटी ८० लाख रुपयांचे ड्राफ्ट आणल्याचे सांगून तसेच त्याचा इन्कम टॅक्‍स भरण्याचा बहाणा करून या व्यावसायिकाला वेगवेगळ्या बॅंक खात्यामध्ये तब्बल ३९ लाख ९० हजार रुपये भरण्यास भाग पाडून त्याची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे.

नवी मुंबई : फेसबुकवरून एका अनोळखी महिलेसोबत मैत्री करणे कामोठे, सेक्‍टर- १२ मधील एका व्यावसायिकाला महागात पडले आहे. या व्यावसायिकाने ज्या अनोळखी महिलेसोबत फेसबुकवरून मैत्री केली, त्या महिलेने परदेशातून एक कोटी ८० लाख रुपयांचे ड्राफ्ट आणल्याचे सांगून तसेच त्याचा इन्कम टॅक्‍स भरण्याचा बहाणा करून या व्यावसायिकाला वेगवेगळ्या बॅंक खात्यामध्ये तब्बल ३९ लाख ९० हजार रुपये भरण्यास भाग पाडून त्याची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. कामोठे पोलिसांनी या प्रकरणातील अज्ञात टोळीविरोधात फसवणुकीसह आयटी ॲक्‍टनुसार गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे. 

ही बातमी वाचली का? तुरुणीचा घरात संशयास्पद मृत्यू 

फसवणूक झालेला शंकरलाल सैनी (४२) हा कामोठे, सेक्‍टर- १२ मध्ये राहण्यास असून त्याचा टाईल्स बसविण्याचा व्यवसाय आहे. ऑक्‍टोबर महिन्यामध्ये शंकरलाल याच्या फेसबुकवर एल्ला बेसील नावाच्या महिलेने फ्रेंड रिक्वेस्ट पाठविली होती. त्या वेळी शंकरलाल याने एल्ला बेसील हिची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारल्यानंतर शंकरलाल हा महिलेसोबत २-३ महिने चॅटिंगद्वारे संपर्कात राहिला. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये एल्ला बेसील या महिलेने भारतात फिरण्यासाठी येण्याचा बहाणा केला होता. त्यानंतर काही दिवसांतच सोनिया गुफ्ता नामक महिलेने एअरपोर्टच्या कस्टम ऑफिसमधून बोलत असल्याचे सांगून शंकरलाल याच्याशी संपर्क साधला. त्या वेळी सोनिया गुफ्ता हिने परदेशातून आलेल्या एल्ला बेसील हिच्याकडे सोन्याचे दागिने, लॅपटॉप, फोन सापडले असून ते सोडविण्यासाठी ४५ हजार रुपये कस्टम चार्ज भरावे लागतील, असे शंकरलाल याला सांगितले.

ही बातमी वाचली का? महाराष्ट्राची ऐतिहासिक उपेक्षा!

महिलेच्या बोलण्यावर विश्वास ठेवून शंकरलाल याने बॅंकेतून ४५ हजार रुपये ट्रान्स्फर केले. त्यानंतर सोनिया गुफ्ता हिने पुन्हा फोन करून एल्ला बेसील या महिलेने तुमच्यासाठी १ कोटी ८० लाख रुपयांचे ड्राफ्ट आणल्याचे सांगून त्याचा इन्कम टॅक्‍स भरावा लागेल, असे सांगितले. मात्र शंकरलाल याने रक्कम भरण्यास नकार दिल्यानंतर सदर टोळीतील इतरांनी शंकरलाल याला रिझर्व्ह बॅंकेच्या नावाने ईमेल पाठवून तसेच फोन करून त्याला वेगवेगळी कारणे सांगून पैसे पाठविण्यास भाग पाडले. त्यानुसार शंकरलाल याने टोळीला एकूण ३९ लाख ९० हजार ६०० रुपये पाठविले. त्यानंतरदेखील सदर टोळीकडून आणखी रक्कम पाठविण्यास फोन येऊ लागल्यानंतर फसवणूक होत असल्याचे शंकरलाल याच्या लक्षात आले. त्यानंतर त्याने कामोठे पोलिसांकडे तक्रार दाखल केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Facebook friendship with stranger in kamothe