अध्‍ययन प्रक्रिया सुरू ठेवण्‍यासाठी फेसबुक सरसावलं पुढे...

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 26 April 2020

#Lockdown मध्ये विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिकवण्यासाठी शिक्षकांसाठी सुविधा पुरवणार...

मुंबई :   जगात कोविड-१९ चा प्रादुर्भाव वाढत असताना देखील अध्‍ययन प्रक्रिया सुरळीत राहण्‍याची खात्री घेण्‍यासाठी फेसबुकनं  'सपोर्टिंग एज्‍युकेशन कम्‍युनिटीज: ऑन ऑनलाईन लर्निंग रिसोर्सेस गाइड' तयार केलं आहे. हे ऑनलाइन संसाधन शैक्षणिक समुदायांना फेसबुक उत्‍पादनं, साधनं आणि  प्रोग्राम्‍सचा वापर करत कशाप्रकारे अध्‍ययन प्रक्रिया सुरू ठेवावी यासंदर्भात मार्गदर्शन करेल आणि अस्‍सल स्रोतांच्‍या माध्‍यमातून कोविड-१९ शी संबंधित माहिती देखील देईल. सध्‍या हे गाइड इंग्रजी, हिंदी, मराठी, गुजराती व कन्‍नड भाषेमध्‍ये उपलब्‍ध आहे. याच्या पहिल्‍या टप्‍प्‍यासाठी फेसबुकनं युनेस्‍कोसोबत भागीदारी केली आहे.

हे ऑनलाइन संसाधन शैक्षणिक समुदायांना फेसबुक पेजेस्, फेसबुक ग्रुप्‍स, फेसबुक लाइव्‍ह, मॅसेंजर, WhatsApp आणि  इन्‍स्‍टाग्राम अशी फेसबुक उत्‍पादनं  आणि साधनांचा वापर करत कशाप्रकारे सहयोग मिळवावा यांसदर्भात मार्गदर्शन करणार आहे. तसंच कोरोनाबद्दलची अचूक माहिती पुरवणाऱ्या विश्‍वसनीय स्रोतांकडून कोविड-१९ बाबत महत्त्वपूर्ण माहिती देईल. यामुळे त्‍यांना सुरू असलेल्‍या महामारीबाबतची चिंता दूर करण्‍यामध्‍ये आणि चुकीची माहिती समजण्‍यामध्‍ये मदत होईल.

 "आमच्‍या ऑनलाइन अध्‍ययन संसाधन गाइडच्‍या माध्‍यमातून आम्‍ही शिक्षक, पालक आणि संबंधित अधिका-यांना मोठ्या प्रमाणात संसाधनांसह सुसज्‍ज करू इच्छितो. ज्‍यामुळे त्‍यांना कनेक्‍टेड राहून डिजिटली सहयोग जोडत दूरूनच अध्‍ययन सुविधा देण्‍यामध्‍ये मदत होईल," असं फेसबुक इंडियाचे संचालक आणि भागीदारी प्रमुख मनिष चोप्रा यांनी म्हंटलंय.

"युनेस्‍को नवी दिल्‍ली व फेसबुक यांच्‍यामधील सहयोग होऊन अध्‍ययन सुविधा देण्‍यामध्‍ये मदत करण्‍यासाठी आनॅलाईन व्‍यासपीठाची सुविधा देण्‍यामध्‍ये महत्त्वाची भूमिका बजावेल,'' असं  युनेस्‍को नवी दिल्‍ली क्‍लस्‍टर ऑफिसचे संचालक व युनेस्‍को प्रतिनिधी एरिक फाल्‍ट यांनी म्हंटलंय.

अधिकाधिक शाळांना व्‍हर्च्‍युअल मॉडेलमध्‍ये रूपांतरण करण्‍याचा सल्‍ला देण्‍यात आला आहे. फेसबुक व्‍हर्च्‍युअल अध्‍ययन प्रक्रिया सुलभ करण्‍यासाठी आणि शिक्षकांना कोविड-१९ बाबत माहितीसह सक्षम करण्‍यासाठी समुदाय आणि  युजर्सना पाठिंबा देण्‍याशी कटिबद्ध आहे. यासाठी शिक्षकांना काही सूचना  देण्यात आल्या आहेत.

शिक्षकांसाठी काही सूचना:

  • तुमच्‍या समुदायाला अद्ययावत माहितीसह सूचित ठेवण्‍यासाठी शाळेच्या Facebook किंवा Instagram पेजचा वापर करा.
  • शिक्षक व पालकांचे फेसबुक ग्रुप्‍स (Facebook groups) तयार करा.
  • WHO सारख्‍या  संसाधनांकडून विश्‍वसनीय माहिती शेअर करा आणि अध्‍ययन अनुभव वाढवा.
  • विद्यार्थ्‍यांसोबत रिअल-टाइममध्‍ये संवाद साधण्‍यासाठी आणि ऑनलाइन चर्चा करण्‍यासाठी Facebook Live चा वापर करा.
  • मॅसेंजरचा वापर करत एकावेळी आठ सहका-यांच्‍या ग्रुप्‍ससोबत कनेक्‍ट होत त्‍यांना ऑडिओ व व्हिडिओ कॉल्‍सच्‍या माध्‍यमातून अपडेट करा.
  • अधिक माहितीसाठी फेसबुक फॉर एज्‍युकेशन ला भेट द्या.

facebook to help teachers by providing resources and tools 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: facebook to help teachers by providing resources and tools