ठाणे जिल्हा प्रमुखपदी नियुक्तीबद्दल केदार दिघे यांची पोस्ट; म्हणाले... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Facebook Post by Kedar Dighe regarding appointment as Thane District Chief

ठाणे जिल्हा प्रमुखपदी नियुक्तीबद्दल केदार दिघे यांची पोस्ट; म्हणाले...

ठाणे : केदार दिघे यांची ठाणे जिल्हा प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आल्याची बातमी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र, माझी अशा कोणत्याही पदी नियुक्ती करण्यात आलेली नाही. माझ्याबाबत कोणताही गैरसमज होऊ नये यासाठी मी माझी बाजू इथे मांडत आहे, असे केदार दिघे (Kedar Dighe) यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिले आहे. (Facebook Post by Kedar Dighe regarding appointment as Thane District Chief)

मागील काही दिवसांपासून केदार दिघे यांची ठाणे जिल्हा प्रमुखपदी नियुक्ती (Thane District Chief) करण्यात आल्याची बातमी सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. परंतु, मी अत्यंत नम्रपणे, प्रामाणिकपणे सांगू इच्छितो की अशा प्रकारची माझी वा कोणाचीच नियुक्ती अधिकृतपणे या क्षणापर्यंत शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे किंवा शिवसेना (shiv sena) पक्षाने केलेली नाही, असे आपल्या फेसबुक पोस्टमध्ये केदार दिघे (Kedar Dighe) म्हणाले.

या पोस्टद्वारे मी असे जाहीर करतो की शिवसेना पक्षाचा एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून मी पक्षासाठी काम करीत आहे. कोणाचाही गैरसमज होऊ नये यासाठी मी माझी बाजू इथे मांडत आहे. धन्यवाद, जय महाराष्ट्र, असेही केदार दिघे यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे.

Web Title: Facebook Post By Kedar Dighe Regarding Appointment As Thane District Chief

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top