जनतेच्या पैशामधून कशाला? collection मधून शिवाजी पार्कला रोषणाई करा, मनसेचा शिवसेनेला टोला

जनतेच्या पैशामधून कशाला? collection मधून शिवाजी पार्कला रोषणाई करा, मनसेचा शिवसेनेला टोला

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. यावेळी संदीप देशपांडेंनी छत्रपती शिवाजी महाराज पार्कला विद्युत रोषणाई करण्याच्या मुद्द्यावरुन मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल केला आहे. 

शिवाजी पार्कला विद्युत रोषणाई करण्याचे श्रेय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मिळू नये, यासाठी घाट घातला जात असून खरोखरचं असं करायचं असेल, तर जनतेच्या पैशातून का? महिन्याला येण्याऱ्या ‘कलेक्शन’मधून करा, असा टोला संदीप देशपांडेंनी लगावला आहे. 

संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना लिहिलेल्या पत्राचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. हे पत्र मुख्यमंत्र्यांनी आमदार स्थानिक निधी अंतर्गत २०२०-२१ मधून प्रशासकीय मंजूरी मिळण्यासाठी लिहिलं आहे. 

या पत्रात लिहिलं आहे की, छत्रपती शिवाजी महाराज पार्कला अनेक ज्येष्ठ नागरिक फेरफटका मारण्यासाठी तसेच अनेक खेळाडू आणि इतर नागरिक धावण्यासाठी मैदानाच्या भोवतालच्या पाऊलवाटेचा/मार्गिकेचा वापर करत असतात. परंतु सदर ठिकाणी पुरेशी प्रकाशव्यवस्था नसल्यामुळे नागरिकांना असुविधा होते. सदर पाऊलवाटेच्या लगत अतिरिक्त विद्युत दिवे आणि इतर सुशोभिकरण करण्यासाठी माझ्या आमदार निधीतून १ कोटी २५ लाख रुपये निधी मंजूर करण्यात यावा.”

हे पत्र शेअर करत संदीप देशपांडेंनी आपल्या फेसबूक पोस्टमध्ये लिहिलं की, 
दरवर्षी लोकांना निखळ आनंद मिळावा, म्हणून राजसाहेब संपूर्ण छत्रपती शिवाजी महाराज पार्कला स्वखर्चाने विद्युत रोषणाई करत असतात. पण ते श्रेय मनसेला मिळू नये, म्हणून जनतेच्या पैशातून वर्षभर रोषणाई करण्याचा घाट घातला जात आहे. माणूस मोठा झाला की कोत्या मानसिकतेचा होते का? आणि खरोखरच करायचं आहे, तर जनतेच्या पैशातून का ? महिन्याला येण्याऱ्या “collection” मधून करा. असो शुभेच्छा”.

Facebook post of mns sandeep deshpande on shivaji park lighting shivsena

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com