

Fadnavis Answers Thackerays With Their Own Words
Esakal
महापालिका निवडणुकीच्या प्रचारानिमित्त महायुतीची सोमवारी शिवाजी पार्कवर सभा झाली. या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूंच्या सभेवर जोरदार हल्लाबेल केला. ठाकरे बंधूंच्या टीकेला त्यांनी व्हिडीओच्या माध्यमातून उत्तर दिलं. राज ठाकरे यांच्याच लाव रे तो व्हिडीओ या वाक्याचा आधार घेत फडणवीस यांनी टोला लगावला. मनसेच्या स्थापनेनंतर आतापर्यंत ठाकरे बंधूंनी एकमेकांवरच केलेल्या आरोपांचे एकत्रित व्हिडीओ फडणवीस यांनी शिवाजी पार्कवर दाखवले.