Maharashtra Cabinet Portfolio : खाते वाटपाचा चेंडू मुख्यंमत्र्यांच्या कोर्टात? फडणवीस म्हणाले... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Eknath Shinde_Devendra Fadnvis

खाते वाटपाचा चेंडू मुख्यंमत्र्यांच्या कोर्टात? फडणवीस म्हणाले...

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार मंगळवारी पार पडला. यानंतर आता खाते वाटपावर चर्चा सुरु झाल्या आहेत. माध्यमांनी चालवलेल्या संभाव्य खाते वाटपाच्या वृत्तावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. तसेच खाते वाटपाचा चेंडू त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोर्टात टाकला. (Fadnavis sends portfolio allocation ball to CM Eknath Shinde court)

हेही वाचा: Sharad Pawar : मित्र पक्षांवरील शरद पवारांच्या आरोपांवर फडणवीसांचे प्रत्युत्तर; म्हणाले...

फडणवीस म्हणाले, माध्यामांनीच खाते वाटप करुन टाकलंय पण एवढचं सांगतो की, माध्यामांनी जे खाते वाटप केलंय ते सपशेल चुकीचं ठरेल. त्याचबरोबर मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे तर ही बैठक खाते वाटपासहित होणार आहे का? या प्रश्नावर फडणवीस म्हणाले, बघत रहा हा मुख्यमंत्र्यांचा प्रेरोगेटिव्ह असतो. फडणवीसांनी या उत्तराद्वारे खाते वाटपाचा मुद्दा मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात टाकला.

काय आहे संभाव्य खाते वाटप?

महिन्याभरापासून रखडलेला राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार आज अखेर पार पडला. यामध्ये शिवसेनेच्या ९ तर भाजपच्या ९ अशा एकूण १८ मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. पण यांपैकी कोणाला कोणतं खात मिळेल याची संभाव्य यादी सूत्रांकडून समोर आली आहे.

असं असेल संभाव्य खाते वाटप -

मुख्यमंत्री, नगरविकास - एकनाथ शिंदे

उपमुख्यमंत्री, गृह, अर्थ - देवेंद्र फडणवीस

महसूल, सहकार - राधाकृष्ण विखे-पाटील

ऊर्जा, वन - सुधीर मुनगंटीवार

सार्वजनिक बांधकाम - चंद्रकांत पाटील

जलसंपदा - गिरीश महाजन

पाणीपुरवठा - गुलाबराव पाटील

कृषी - दादा भुसे

पर्यटन आणि पर्यावरण विभाग - दीपक केसरकर

उत्पादन शुल्क - शंभुराज देसाई

समाजिक न्याय - सुरेश खाडे

रोजगार हमी - संदीपान भुमरे

उच्च व तंत्रशिक्षण - तानाजी सावंत

गृहनिर्माण - रविंद्र चव्हाण

अल्पसंख्यांक विकास - अब्दुल सत्तार

आदिवासी विकास - विजायकुमार गावित

विधी व न्याय - मंगलप्रभात लोढा

ग्रामविकास - संजय राठोड

आरोग्य - अतुल सावे

उद्योग - उदय सामंत

Web Title: Fadnavis Sends Portfolio Allocation Ball To Cm Eknath Shinde Court

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..